गोळेगांव ग्रामपंचायत मध्ये झालेल्या रोजगार हमी व शोष खड्डे कामाबद्दल भ्रष्टाचाराबाबत जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन

23

🔸यापूर्वी 19 ऑक्टोबर रोजी सादर केले होते निवेदन – मात्र कार्यवाही शुन्य

🔹आता आमरण उपोषणाचे हत्यार हाती घेण्याचा इशारा

✒️नवनाथ आडे(गेवराई,विशेष प्रतिनिधी)मो:-9075913114

गेवराई(दि.26नोव्हेंबर):- तालुक्यातील मौजे गोळेगांव येथील ग्रामपंचायत अंतर्गत 2019-2020 मधील कामात झालेल्या भ्रष्टाचाराची तात्काळ चौकशी करण्यात यावी यासाठी गोळेगांव ग्रामपंचायत सदस्य शिवाजी काळे ,देवराज कोळे, सुदामराव चव्हाण, केशव काळे यांनी जिल्हाधिकारी बीड यांना निवेदन दिले आहे.

निवेदनाद्वारे करण्यात आलेल्या मागण्या या प्रामुख्याने 1गोळेगांव ग्रामपंचायत अंतर्गत आठ महिन्यांपासून मासिक सभा झालेल्या नसून प्रत्यक्षात प्रोसेडिंग वर बोगस सह्या झालेल्या आहेत व ठराव झालेले आहेत याची सखोल चौकशी करण्यात यावी, गोळेगांव ग्रामपंचायत अंतर्गत गोळेगांव ते जातेगांव हे अंतर प्रत्येक्षात हे तीन कि.मी असून पदाधिकारी व अधिकारी यांच्या संगनमताने गोळेगांव ते कानिफनाथ गड हे अंतर तीन कि.मी. दाखवून वृक्षलागवड करण्यात आली आहे.

या कामामध्ये अनियमितता आहे याची चौकशी करण्यात यावी,गोळेगांव ग्रामपंचायत अंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत १००टक्के पंचायत समिती स्तरावर शोष खड्डे झालेले आहे त्याच पि टी आर प्रमाणे पहाणी करुण अहवाल सादर करण्यात यावा अशा विविध मागण्यांचे निवेदन मा.गटविकास अधिकारी पं.स गेवराई यांच्या सह जिल्हाधिकारी यांना गोळेगांव ग्रामपंचायत सदस्य शिवाजी काळे, देवराज कोळे सुदामराव चव्हाण ,केशव काळे यांनी दिले आहे.

याही अगोदर सदरील ग्रामपंचायतचे कामाबद्दल अनेक वेळा तक्रारी करूनही 19 आॅक्टोंबर 2020 रोजी पंचायत समिती गटविकास अधिकारी व जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे कळविले होते तरी अद्याप ही काहीच कारवाई झाली नाही .सदरील भ्रष्टाचाराविरोधात कारवाई नाही झाल्यास आपल्या कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.