गांगापुर येथे प्रवाशी निवाऱ्याची मागणी

25

✒️सचिन महाजन(तालुका प्रतिनिधी,हिंगणघाट)मो:-9765486350

हिंगणघाट(दि.27नोव्हेंबर):-तालुक्यातील गांगापूर बस स्थानकावर प्रवाशी निवारा देण्यात यावा .अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. गांगापूर येथील 40 ते 50 विद्यार्थी, मुले मुली पिपरी वडनेर हिंगणघाटला शिक्षण घेण्यासाठी येरझाऱ्या येण्याकरीता करत असतात . परंतु त्याच उभे राहण्यासाठी गांगापूर येथील बसस्थानकावर कोणतीच व्यवस्था नाही, बसच्या प्रतीक्षेत अनेकजण रस्त्यावर थांबतात ,पाऊस वारा ऊनापासून कोणतीही संरक्षणाची व्यवस्था नाही.

तसेच प्रवासी निवार्‍या अभावी प्रवाशांना तानसंतास उभे राहावे लागते त्यामुळे विद्यार्थी महिला रूंगन व ज्येष्ठ नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हालबेहल होतात एसटी महामंडळाचे गाव तिथे प्रवासी निवारा देण्यात यावा, हे ब्रीद आहे ,मग गांगापुर गावाकडे दुर्लक्ष का आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रवाशांचे हाल लक्षात घेत संबंधितांनी तात्काळ लक्ष देऊन गांगापूर येथे तात्काळ प्रवासी निवारा देण्यात यावा अशी मागणी नागरिक व विद्यार्थी करत होत आहे.