बरबडा येथे पदवीधर मतदारसंघात शांततेत मतदान

26

🔹औरंगाबाद विधानसभा पदवीधर मतदार संघ

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

औरंगाबाद(दि.1डिसेंबर):- विधानसभा पदवीधर मतदार संघातील आज रोजी मतदान घेण्यात आले यावेळी बरबडा येथे नव्यानेच बुथ ची निर्मिती करण्यात आली होती.या मतदान केंद्रावर एकूण 314 मतदार होते.त्यापैकी झालेले मतदान पुरुष 197 व स्त्रिया 27 असे एकूण 214 एकूण टक्केवारी 71.33 एव्हडे मतदान झाले अतिशय उत्स्फूर्तपणे पणे सर्व पदवीधर यांनी केले.हे केंद्र जि प के प्रा कन्या शाळा येथे ठेवण्यात आले होते.

यावेळी मतदान केंद्रावर जि प सदस्या सौ पुनमताई पवार,माणिकराव लोहगावे, बंडू पा चव्हाण यांनी भेट दिली.या केंद्रावर मतदान केंद्राध्यक्ष महेश गणेशराव गुंडरे,सूक्ष्म निरीक्षक वरुडकर एस एच मतदान अधिकारी कानोडे जी बी, इंगळे एस व्ही,सोनवणे एस एच छायाचित्रकार प्रदीप पवार आरोग्य कर्मचारी म्हणून डॉ शिवाजी भरकड समुदाय आरोग्य अधिकारी, डॉ तुंगेनवार एस जी, कुंटुरवार के बी, मुक्ता वानखेडे आशावर्कर,तांबोळी, कुंटुर पोलीस स्टेशनचे पीएसआय दिनेश येवले सर, पो जमादार पोले सर, पो कॉन्स्टेबल भार्गव सुवर्णकार, आऊलवार साहेब, चव्हाण मॅडम यांनी चोख बंदोबस्त करून मतदान प्रक्रिया शांततेत पार पडण्यास मोलाचे सहकार्य केले.

त्यांना ग्रामपंचायत चे ग्राम विस्तार अधिकारी रावीराज नवहारे, पोतनवार बाबा, पो पाटील कानगुले व सर्व कर्मचारी यानी मोलाचे सहकार्य केले.