शिक्षकांच्या गंभीर समस्यासाठी पुरोगामी समितीची सभा संपन्न

37

✒️चिमुर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमुर(दि.2डिसेंबर):-महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा शाखा चंद्रपूरची सभा नुकतीच संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष एन. आर. कांबळे तसेच राज्य नेते विजय भोगेकर, राज्य सरचिटणीस हरीस ससनकर प्रामुख्याने उपस्थित होते.

सभेत मागील सभेचे इत्तीवृत्त वाचन झाल्यानंतर जमाखर्चाला मंजुरी देण्यात आली. जिल्हा परिषद प्रशासनाच्या दिरंगाईमुळे शिक्षकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. जिल्हाध्यक्ष एन. आर. कांबळे यांनी शिक्षकांच्या गभीर समस्येचे विवरण सांगताना म्हणाले की, मागील तीन वर्षापासून शिक्षकांना वरिष्ठ श्रेणीचा लाभ मिळालेला नाही, जिपीएफ खात्यातून स्वतःची रक्कम असून सुद्धा स्वतःच्या कामासाठी मिळत नाही, शिक्षकांची मेडिकल बिले अद्यापही प्रलंबित आहे.

सेवापुस्तिकेची पडताळणी लवकर न करणे, शिक्षकांना वेळेवर पेन्शनची रक्कम मिळत नाही. यावेळी जिल्हा कार्यकारीणीने प्रलंबित समस्या समजावून घेऊन समस्या दूर करण्यासाठी संघटनेला आंदोलन करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. तसेच महिला मंच यांनी सभा घेऊन संघटनेचे कार्य वाढविण्यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये महिला मंचची स्थापना करावी असे मत सुनिता इटनकर यांनी व्यक्त केले.

सभेचे संचालन व प्रास्ताविक जिल्हा सरचिटणीस रवी सोयाम यांनी केले तर उपस्थितांचे आभार जिल्हा कार्याध्यक्ष लोमेश येलमुळे यांनी मानले. सभेचे व्यवस्थापन जिल्हा कोषाध्यक्ष निखील तांबोळी यांनी सांभाळले. सभेला जिल्ह्यातील संघटनेचे पदाधिकारी बहुसंखेने उपस्थित होते.

Previous articleNovember 27, 2020
Next articleशिक्षण आणि बाजारीकरण
Purogami Sandesh
पुरोगामी संदेश वेब पोर्टल पर प्रकाशित समग्री पर किसी प्रकार की आपत्ती/शिकायत होने पर purogamisandesh@gmail.com पर पंजीकृत की जायेगी ! संपादक/प्रकाशक के Whats App नंबर अथवा पोर्टल के कॅमेंट बाँक्स मे की गयी सूचना/शिकायत/आपत्ती का निपटारा किया जाए यह आवश्यक नही है ! - प्रकाशक/आपत्ती निवारण अधिकारी