दिग्रस येथे डॉ .बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनी काव्य व गीत गायनाने आदरांजलीचे आयोजन

29

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)मो:-7875157855

पुसद(दि.2डिसेंबर):-दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा दिग्रस यांच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त काव्य वाचन व गीत गायनाने आदरांजली वाहण्याचे आयोजन स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पडगिलवार येथे दि.६/१२/२०२०रोजी दु.२:०० वाजता करण्यात आले आहे.

🔹या स्पर्धेकरिता नियम खालील प्रमाणे आहेत….

१)ज्या स्पर्धाकांना भाग घ्याचा आहे .
त्यांनी आपली नावे ५ डिसेंबर २०२० पर्यंत मोबाईलवर मो.नं.९४२००४०८२०,८२०८६६८१७४ कळवावी .
२)काव्य व गीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित असावे .
३)काव्य किंवा गीत स्वरचित किंवा इतरांचे पण सादर करता येईल .
४)काव्य व गीत हे दोन प्रतीत आणावे एक प्रत आयोजकांकडे जमा करावे.

काव्य वाचन व गीत गायन सादर करणाऱ्या स्पर्धेमधून प्रथम, द्वितीय ,तृतीय असे नंबर काढून स्पर्धकांना योग्य ते बक्षीस देण्यात येईल .या कार्यक्रमात जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घेऊन सहकार्य करावे असे आहवान तालुकाध्यक्ष विनायक देवतळे यांनी केले आहे.