हणेगाव जिल्हा परिषद शाळेला प्राथमिक शिक्षणाधिकारी दिग्रसकर यांची भेट

26

✒️महादेव उप्पे(देलगुर प्रतिनिधी)मो:-९४०४६४२४१७

देगलूर(दि.3डिसेंबर):- कोरोणाच्या काळात पहिल्यांदाच दि.०२/१२/२०२० रोजी सर्वत्र शाळा सुरु झाल्याने जिल्हा परिषद नांदेड प्राथमिक शाळेचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी जिल्हा परिषद हायस्कुल हणेगाव शाळेला भेट देऊन आढावा घेतला.सर्वत्र कोरोणाचा संसर्ग पसरल्याने जवळपास नऊ महिन्यापासून शाळा महाविद्यालये बंद करण्यात आले होते यामुळे विद्यार्थ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले आहे.

नुकतेच कोरोणाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने दि.०२/१२/२०२० पासून नववी ते बारावी पर्यंतचे वर्ग चालू करण्याचे शाशनाने आदेश दिले आहेत.यानिमीत्त शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेचा आढावा घेण्यासाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर व देगलूरचे गटशिक्षणाधिकारी राजकुमार जाधव यांनी शाळेला भेट दिली.यावेळी शिक्षणाधिकारी यांनी कोरोना काळात पहिल्यांदाच शाळा चालु झाली असल्याने सर्व माहिती घेण्यात आली.पालकांचे समत्ती पत्र विद्यार्थी उपस्थिती यांची माहिती कोरोणा बाबत सर्व नियमपाळून सतर्क राहण्याची सुचना देण्यात आली.

यावेळी शाळेला सेवक नसल्याने व डागडुजी आणि संरक्षण भिंत नसल्याने अनेक अडचणी निर्माण होत आहेत असे प्रश्न विचारले असता अनुकंपातुन शाळेला लवकरच सेवक देण्यात येईल व शाळेच्या डागडुजीसाठी प्रस्ताव पाठवावे व संरक्षण भिंतीसाठी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर मागणी केल्यास मोठी निधी उपलब्ध करून देऊ असे सांगितले.गावक-यांनी शाळा स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे सांगून नियमानुसार सर्व शिक्षकांनी दैनंदिन शाळेला उपस्थित राहून विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करावे असे सांगितले.