राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ (RMBKS) युनियनच्या नामफलकाचे अनावरण

30

✒️उरण(रायगड जिल्हा)-(पुरोगामी संदेश नेटवर्क)

उरण(दि.3डिसेंबर):-राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ (RMBKS) ची मेहर यार्ड मु. खोपटे, ता. उरण येथील मे. युनिकॅान मरीन सर्विसेस एल.एल.पी मध्ये संघटनेची स्थापना झालेली आहे.या युनियनच्या नामफलकाच्या अनावरण व उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ (RMBKS) ही कामगार क्षेत्रातील नामांकित प्रसिद्ध अशी कामगार संघटना आहे. संघटनेची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली असून कामगारांचा विश्वास खूप मोठया प्रमाणात संपादन करणारी संघटना म्हणून नावारूपास आली आहे. गोरगरीब व बहुजनांना न्याय देण्यास, त्यांचे हक्क मिळवून देण्यात ही कामगार संघटना नेहमी अग्रेसर राहिली आहे.असे मत कामगार नेते संतोष घरत यांनी व्यक्त केले.

यावेळी कॉन्टिनेन्टल अध्यक्ष वासुदेव ठाकूर, उपाध्यक्ष प्रमोद म्हात्रे, यूनोकोन मरीन सर्विस एल एल पी (मेहेर) यार्ड चे कामगार कमेटी अध्यक्ष महेश पाटील, कार्याध्यक्ष मंगेश पाटील, प्रदीप ठाकूर, प्रशांत ठाकूर, अविनाश ठाकूर, परेश ठाकूर, उपाध्यक्ष महेश म्हसकर, महा सचिव तुळशीराम पाटील, सचिव पांडुरंग म्हात्रे, कोषाध्यक्ष भानुदास ठाकूर, सचिव समाधान ठाकूर, आदित्य म्हात्रे, मधुकर ठाकूर, सरपंच विशाखा ठाकूर, उपसरपंच सुजीत म्हात्रे, सदस्य रीतेश ठाकूर, A D ठाकूर, शुभांगी ठाकूर, ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथ पाटील, बांधपाडा अध्यक्ष बबन ठाकूर तसेच RMBKS युनियनचे सर्व कामगार सभासद पदाधिकारी, कार्यकर्ते या कार्यक्रमास मोठया संख्येने उपस्थित होते.