इतर मागासवर्ग महामंडळाच्या कर्ज योजना

48

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

चंद्रपूर(दि.4डिसेंबर):- महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, चंद्रपूर यांना आर्थिक वर्ष 2020-21 करिता बीज भांडवल योजना, वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना व गट कर्ज व्याज परतावा योजनेकरिता उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. बीज भांडवल योजनेकरिता भौतीक 45 प्रकरणे, आर्थिक रुपये 33.75 लाख निश्चित केले आहे. तसेच वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजनेकरिता भौतिक 50 प्रकरणे, आर्थिक रुपये 57 लाख व गट कर्ज व्याज परतावा योजनेकरिता भौतीक 12 प्रकरणे, आर्थिक रु. 70.25 लाख उद्दिष्ट निचित केले आहे.

महामंडळाच्या विविध योजनांची माहिती www.msobcfdc.org या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. अधिक माहिती करिता शाखा व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य इतर मागावर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जलनगर, चंद्रपूर येथे किंवा दुरध्वनी क्रमांक 07172-262420 यावर संपर्क साधावा असे महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक संजय बावनकर यांनी कळविले आहे.