उमरी येथे राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांची पुण्यतिथी संपन्न

89

🔹युवकांना ग्रामगीता वाटप तसेच ग्रामस्वच्छता अभियान

✒️सावली(पुरोगामी संदेश नेटवर्क)

सावली(दि.10डिसेंबर):- तालुक्यातील उमरी ( हरांबा ) ह्या छोट्याश्या गावात कालभैरव जयंती आणि राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराज पुण्यतिथी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. उदघाटन ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांचे हस्ते झाले तर अध्यक्षस्थानी गडचिरोली जिल्हा सेवाधिकारी डाॕ. शिवनाथ कुंभारे होते . प्रचारक सुखदेव वेठे , श्री. जेंगठे ,आत्माराम मंगर आदींची उपस्थिती होती . प्रास्तविक शाखाध्यक्ष विठ्ठल चुधरी यांनी केले. याप्रसंगी बंडोपंत बोढेकर यांनी गावातील युवकांनी सामुदायिक पध्दतीने केलेले श्रमदान , ग्रामसफाई चे कौतुक केले व म्हणाले , गावाची सेवा निरपेक्ष भावनेने केली पाहिजे . ग्रामजीवनातील उदासिनता दूर करण्यासाठी ग्रामगीतेचा अवलंब करावा. तेथे दिली गेलेली सूत्रे व्यक्तीला स्वावलंबी , श्रम महात्म्य ,वैज्ञानिक दृष्टिकोन देणारी आहे.

डाॕ. कुंभारे यांनीही समयोचित विचार व्यक्त केले. याप्रसंगी गावातील युवकांना ग्रामगीता , प्रार्थनाष्टक आदी साहित्याचे वितरण करण्यात आले. सूत्रसंचालन संजीव मेश्राम यांनी केले तर विठ्ठल चुधरी यांनी आभार मानले. सकाळपासूनच ग्रामस्वच्छता , ग्रामगीता वाचन आणि ध्यानपाठ करण्यात आला. तीन दिवसांत झालेल्या ध्यानपाठ प्रसंगी गणुजी चुधरी, संजय मेश्राम आणि सुभाष गुरूनुले यांनी विचार मांडले तर कालभैरव मुर्तीची प्राणप्रतिष्ठा अमोल महाराज आमगावकर यांचे हस्ते करण्यात आले तर प्रदीप चौधरी वरोरा यांच्या कीर्तनाचा लाभ ग्रामस्थांनी घेतला.

कालभैरव मंदिराचा लोकार्पण सोहळा जि. प. सदस्य संतोष तांगडपल्लीवार यांचे हस्ते झाला तर अध्यक्षस्थानी माजी पं. स. सभापती देवराव मुद्दमवार होते . सावली पं.स . उपसभापती रविंद्र बोलीवार , गणपतराव कोठारे, ओमदेव मंगर , रमाकांत डोईजड , हर्षकुमार डोईजड , मोहन कुनघाडकर , पोलिस पाटील श्रीकृष्ण भुरसे आदी मान्यवरांची उपस्थिती होती . ग्रामस्थांनी विविधांगी केलेल्या कार्याचे कौतुक उपस्थित अतिथींनी केले.

लोकसहभागातून झालेल्या कालभैरव या मंदिराचे बांधकाम करण्याचे काम गुरूदेव आरेकर यांनी केले. तीन दिवसीय कार्यक्रमाचे नियोजन सचिव सोमेश्वर गेडाम , गौरव आरेकर , आकाश मंगर , ओमदेव चुधरी, दुमाजी आरेकर , संतोष गेडाम, मनोज आरेकर , संदीप चुधरी , संजय गेडाम , ओमदेव आरेकर ,किशोर कांबळे, टिकाराम मंगर आदी गावातील सर्व युवा वर्गांनी केले. ४५ घराची वस्ती असलेले हे गाव ह्या कार्यक्रमानिमित्ताने ४० युवा वर्गांनी स्वच्छता केली तसेच व्यसनमुक्त जीवन जगण्याचा संकल्प काही घेतला