नेर येथे जिल्हा परिषद गटात विविध विकास कामांचे उद्घाटन

37

✒️संजय कोळी(विशेष प्रतिनिधी)मो:-9075716526

नेर(दि.10डिसेंबर):-जिल्हा परिषद गटात जि प सदस्या सौ मनिषा शंकरराव खलाणे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले.येथील कुंभारटेक परिसरात जिल्हा परिषदेच्या दलीत सुधार योजनेंतर्गत महिला शौचालयासाठी 8 लक्ष मंजुर निधीतील कामाचे उद्घाटन सकाळी 10 वा श्रीफळ वाहुन करण्यात आले.जिल्हा क्रिडा विभागाच्या मार्फत व्यायामशाळेसाठी 7 लक्ष मंजुर करण्यात आले.

असुन त्यातुन चंदन टेकडी परिसरातील गावठाण जागेत व्यायामशाळेचे भुमीपुजन करून कामाचा शुभारंभ करण्यात आला.नूर नगर येथे 2 लक्ष किंमतीचे पेव्हर ब्लाॅकच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले.शिरधाने प्र नेर येथे जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागामार्फत दगडीनाला लघुबंधार्यासाठी 14 लक्ष किंमतीच्या दुरुस्ती कामाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी नेरचे माजी सरपंच शंकरराव खलाणे,शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख मनिष जोशी,माजी सरपंच साहेबराव सोनवणे,डाॅ सतिष बोढरे,संतोष ईशी, माजी प स सदस्या ज्योती कपुर,अश्विनी भदाणे,प.स.सदस्य अर्जुन गायकवाड,माजी उपसरपंच पंढरिनाथ शंखपाळ,वसंत देशमुख,माजी ग्रामपंचायत सदस्य कविता आखाडे,धर्मा माळी,देविदास माळी,संजय चौधरी,बापु सोनवणे,पांडु चौधरी,वसंत बोरसे,छोटु माळी,प्रविण एंडाईत,फरिद पठाण,गुड्डु शेख,शकुर खाटीक,झिपा नाईक,दावल ठाकरे,दौलत मोरे,राजधर अमृतसागर,निर्मल आखाडे,दगडु चौधरी,अशोक चौधरी,दिनेश सोनवणे,प्रशांत खलाणे,अरुण खलाणे,देवा जाधव, नाना भदाणे,ईश्वर गुरव,तुषार सोनवणे,नितीन भदाणे,खेमराज महाले,भगवान पाटील,रमेश पाटील,शाखा अभियंता वानखेडे,ठेकदार जगदिश देवरे,प्रविण चौधरी,जितेंद्र देवरे सर्व जाती धर्मातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते