वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशध्याक्ष अशोक सोनोने यांनी केले प्रा सदाशिव भिंगे यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन

30

🔸ना चिट्ठी, ना कोई संदेश, जाने वो कौन-सा देश
जहाँ तुम चले गये

✒️संजय कांबळे माकेगावकर(अहमदपूर,प्रतिनिधी जिल्हा)मो:-9860208144

अहमदपूर(दि.11डिसेंबर):-वंचित बहुजन आघाडी चे संस्थापक अॅड बाळासाहेब आंबेडकर यांचा संदेश घेऊन वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तथा पार्लमेंटरी बोर्ड सदस्य अशोक सोनोने यांनी 26 नोव्हेंबर रोजी अपघातात प्राण गमावलेले वंचित बहुजन आघाडी लातूर जिल्हाध्यक्ष तथा वंचितचा ढाण्या वाघ प्रा.सदाशिव भिंगे व त्यांच्या तीन सहकारी मित्रांच्या ही कुटुंबियांची भेट प्रत्येकाच्या गावी जाऊन घेतली.वंचित बहुजन आघाडी चे प्रदेशध्याक्ष अशोक सोनोने हे लातूर मध्ये आले आसता प्रा सदाशिव भिंगे च्या कुटुंबियांसह सर्वांच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांना धीर दिला. अपघातात मरण पावलेले सर्व कार्यकर्ते तरुण होते.

त्यांच्या आई-वडील, भाऊ, पत्नी व लहान मूलांचे सांत्वन करीत वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते नेहमी आपल्याला सहकार्य करतील अशी ग्वाही अशोक सोनोने यांनी दिली. अॅड बाळासाहेब आंबेडकर व संपूर्ण वंचित बहुजन आघाडी आपल्या दुःखात सहभागी आहोत व भविष्यात ही आपल्या सोबत असणार असे बोलत वंचितचे नाते जनतेच्या वेदनेशी आहे.

वंचित बहुजन आघाडी चा इतिहासात प्रा. सदाशिव भिंगे हे अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांचे स्वाभिमानी शिलेदार म्हणून अमर राहतील अशी भावना ही त्यांनी व्यक्त केली. यावेळी सोबत वंचित बहुजन आघाडीचे संतोष सूर्यवंशी, प्रशिक्षक प्रा. सुरेश शेळके, डॉ तात्याराव वाघमारे, अमोल लांडगे, मार्शल माने, पप्पू गायकवाड, वैभव कांबळे, रतन आचार्य, मुर्तुजा चाचा, वागमरे मामा, मामडगे मामा, अॅड विठ्ठल घोडके,सतीश कांबळे इतर पदाधिकारी उपस्थित होते..