डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजने मधील जाचक अटी रद्द करा – किरण खरात

27

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड,माण)मो:-9075686100

म्हसवड(दि.11डिसेंबर):-बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना हि महाराष्ट्र शासनाची अतिशय महत्वकांक्षी योजना असून या द्वारे अनुसूचित जाती मधील सर्व घटक नवीन सिंचन विहरी खुदाई चा लाभ घेऊ शकतात,परंतु माण तालुक्यातील ऐकून ४२ गावे या योजने मधून गेले ३ वर्षां पासून जुन्या सर्वे च्या आधारे अंशतः शोषित या वर्गवारीत घोषित केले मुळे सदर गावातील शेतकरी वर्गाला या योजनेचा लाभ घेता येत नाही.

वास्तविक या ४२ गावांमध्ये गेले ४ वर्षां मध्ये “सत्यमेव जयते वॉटरकप पाणी फौंडेशन ” ,” जलयुक्त शिवार”
लोकसहभागातून तसेच जलसंपदा विभाग यांचे वतीने मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे झाली असून या गावामध्ये भूजल पातळी मध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून अशी गावे या योजनेपासून वंचित राहिलेमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.

याकामी वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणा सातारा यांचे मार्फत फेर सर्वे करणे करून पात्र गावांचा नव्याने या योजनेमध्ये समावेश करणेस अपेक्षित आहे.असे झालेस या गावामधील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचविणेस मदत होईल. तरी या वंचित ४२ गावांचा या योजनेमधील जाचक अटी रद्द करून नव्याने समावेश करून शेतकऱ्यांना याचा लाभ मिळवून द्या अशी विनंती सामाजिक कार्यकर्ते किरण खरात यांनी माण तालुक्याचे गटविकास अधिकारी श्री. एस. बी. पाटील याना निवदेन देऊन केली आहे.

“हि योजना प्रभावी पणे राबवावी अशी संबंधित गावातील सर्व शेतकऱ्यांची मागणी असून या कामी गेली २ वर्षे प्रशासनाच्या विविध पातळीवर पाठपुरावा करत आहे .प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या वर्षी या योजने मधून माण तालुक्यातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांना याचा लाभ मिळवून द्यावा.” किरण खरात अपात्र ठरविण्यात आलेल्या ४२ गावाचा फेर सर्व्हे करणे कामी भूजल सर्वेक्षण यंत्रना जिल्हा परिषद सातारा यांचे कडे पाठपुरावा करून जास्तीत जास्त लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यात येईल असेश्री.एस. बी. पाटील गट विकास अधिकारी माण यांनी सांगितले.