म्हसवड सिद्धनाथ यात्रा कोरोनामुळे रद्द

31
✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड,माण)मो:-9075686100

म्हसवड(दि.11डिसेंबर):-लाखो भाविकांचे श्रद्धा स्थान असलेल्या म्हसवड येथील ग्रामदैवत श्री सिद्धनाथ व माता जोगेशवरी देवीचा रथोत्सव काहीही केले तरी होणार नाही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून प्रशासनाकडून हा निर्णय घेणेत आला. अशी माहिती माण तालुक्याचे प्रांताधिकारी श्री शैलेश सूर्यवंशी यांनी दिली.

म्ससवड पोलीस ठाण्यात आयोजित बैठकीत सूर्यवंशी म्हणाले सध्याचा काळ हा कोरोना चा काळ असून कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही स्वरूपाचे धार्मिक आणि सामाजिक उत्सव घेणे उचित नाही ज्याने कोरोना रुग्णामध्ये वाढ होईल या कारणामुळे आज वरच्या सर्व यात्रा रद्द करणेत आल्या आहेत आणि म्हणूनच म्हसवड सिद्धनाथ यात्राही यावर्षी रद्द करण्यात आली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख म्हणाले यात्रेसाठी प्रशासनाने जे नियम आखून दिले आहेत ते तंतोतंत पाळून प्रशासनास सर्व भाविकांनी मदत करावी या काळात ठराविक लोकांनाच विधीसाठी परवानगी दिली जाणार आहे आणि त्या लोकांचे हमी पत्र घेतले जाईल.
सिद्धनाथ यात्रेचा मुख्य दिवस हा मंगळवार 15 डिसेंबर रोजी येत आहे त्यामुळे शहरात 144 कलम लागू करणेत आले असून या नियमांचे उल्लंघन करणारास कठोर शासन केले जाईल त्यामुळे यात्रा काळात मंदिरात येण्याचे टाळावे से प्रशासनाकडून आवाहन करणेत आले आहे जेणेकरून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये याची दक्षता घेता येईल.
या बैठकीस तहसीलदार बी.एस.माने,पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश देशमुख,मुख्याधिकारी डॉ.सचिन माने,नगराध्यक्ष श्री तुषार विरकर, उपनगराध्यक्षा सौ.स्नेहल सूर्यवंशी,रथाचे मानकरी श्रीमंत अजित्राव राजमाने (बापू ) माजी नगराध्यक्ष विलासराव माने आणि सिद्धनाथ देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते.