पालकमंत्री दत्ता मामा भरणे व आमदार संजय मामा शिंदे यांची अंजनडोह गावास भेट दिली

28

✒️नागेश खूपसे(सोलापूर प्रतिनिधी)मो:-7775096293

सोलापूर(दि.11डिसेंबर):-पालकमंत्री दत्ता मामा भरणे व आमदार संजय मामा शिंदे यांनी आज अंजनडोह गावास भेट दिली. यावेळी वीज बोर्डाचे अधिकारी व वनविभागाचे अधिकारी यांची सयुक्त बैठक घेण्यात आली. बिबट्याला पकडण्याच्या नियोजनासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत वीट परिसरातील शेतकर्यांनी वीजेच्या संदर्भातील अडचणी पालकमंत्र्यासमोर मांडल्या.

ज्या भागात बिबट्याचा वावर आहे त्याच भागात दिवसा शेतीसाठी वीज सोडण्याच्या सूचना आमदार संजय मामा शिंदे यांनी दिल्या. यावेळी वीजेचे जे प्रश्र्न प्रलंबित आहेत ते सर्व मार्गी लावण्याच्या सूचना पालकमंत्री दत्ता मामा भरणे यांनी दिल्या. यावेळी परिसरातील शेकडो शेतकरी व वीज बोर्डाचे अधिकारी आणि वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते.