हिंगणघाट येथील जाळीत प्रकरण खटल्याची सुरुवात 15 दिवसांनंतर होईल – ऍड निकम

30

🔸आरोपी विक्की नगराळे याचा वकील गैरहजर

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)मो:-9923451841

हिंगणघाट(दि.14डिसेंबर):-सरकारतर्फे न्यायालयात काही आरोप प्रस्तावित करण्यात आले होते,परंतु आरोपीचे वकील गैरहजर असल्याने येत्या दि.१७ आरोपनिश्चिती होईल,त्यानंतरच १५ दिवसांनी खटल्याची सुरुवात केली जाण्याची मागणी न्यायालयाकड़े मागणी केली असून न्यायालयाने ही बाब मान्य केल्याने खटल्यातील प्रत्यक्ष पुराव्याची साक्षीदाराची सुनावणी करीत कामकाज येत्या जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात सुरु होईल अशी माहिती शासनाचे अधिवक्ता उज्वल निकम यांनी आज दि.१४ रोजी पत्रकारांना दिली.

आज सकाळी पोलिसांनी आरोपी विक्की उर्फ विकेश नगराळे याससुद्धा न्यायालयात हजर केले होते.पेशाने प्राध्यापिका असलेल्या अंकिता पिसुड्डे या अविवाहित तरुणीस भरदिवसा जाळल्याप्रकरणी आज जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री माजगावकर यांचे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.यावेळी सुप्रसिद्ध अधिवक्ता उज्वल निकम यांनी न्यायालयात पैरवी केली.

विवाहित असलेला व एका मुलीचा पिता असलेला आरोपी विक्की उर्फ विकेश नगराले याने मृतक प्राध्यापिका कु.अंकिता हिला एकतर्फी प्रेमातुन जीवंतपणे जाळुन तिचा सूड उगविला.दि.३ फेब्रुवारी रोजी घडलेल्या घटनेबद्दल हिंगणघाट तालुक्यात तसेच संपूर्ण महाराष्ट्रासह देशात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली.जनता आणि लोकप्रतिनिधी तसेच पिसुड्डे कुटुंबियांनी केलेल्या मागणीनंतर शासनाने याची विशेष दखल घेतली.गृहमंत्री ना.अनील देशमुख यांनी सुप्रसिद्ध अधिवक्ता उज्वल निकम यांची नियुक्ती करीत तात्काळ न्यायालयीन कारवाई सुरु करण्याची घोषणा केली.परंतु यादरम्यान कोविड-१९ च्या संहितेमुळे न्यायालयीन प्रक्रिया स्थगित राहिली.
आता मात्र लवकरच खटल्याचे कामकाज सुरु होणार असल्याची ग्वाही यावेळी एड. निकम यांनी दिली.