परभणी पोलिस दलाकडून बेकायदेशीर जुगार खेळणाऱ्या २३आरोपी विरुद्ध कार्यवाही

35

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.16डिसेंबर):- दिनांक १४/१२/२०२०रोजी गंगाखेड शहरातील गायकवाड यांच्या बंद पडलेल्या जिनिगवर काही इसम विनापरवाना बेकायदेशीर मटका जुगार खेळत असताना चार आरोपीला ताब्यात घेतले असून उर्वरीत १९आरोपी पोलिसांना पाहून फरार झाले असून सदार चार आरोपीकडून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम २०६८३० रुपयेचा मुद्देमाल जप्त करून,पोहे/विष्णू भिसे यांच्या फिर्यादी वरून पोलिस ठाणे गंगाखेड येथे २३आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून १९आरोपी फरार झाले आहे.

सादर कार्यवाही मा.पोलिस अधिक्षक परभणी श्री जयंत मीना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक बापूराव दडस, पोउपनी/चंद्रकांत पवार,पोउपनी/विश्वास खोले, सुग्रीव केंद्रे,निलेश भुजबळ, विष्णू भिसे,अरुण कांबळे, जमोदीन फारुकी, अझर पटेल,राहुल चिंचाने, यशवंत वाघमारे, शंकर गायकवाड, दिपक मुदिरज,नेमणूक पोलिस अधिक्षक कार्यालय परभणी यानी केली आहे.