महिलांनी विकासाची कास धरावी – राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कार्याध्यक्ष शाहीन भाभी हकीम

37

🔹अहेरीत महिला शिक्षिकांचा सत्कार समारंभ

✒️राहुल डांगे(विशेष प्रतिनिधी)मो:-9850801314

अहेरी(दि.16डिसेंबर):- महिलांनी बेडर, बिनधास्त व निर्भीडपणे पुढे येऊन विकासाची कास धरावी असे प्रतिपादन राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष तथा चंद्रपूर जिल्ह्याचे महिला निरीक्षक शाहीन भाभी हकीम यांनी केले.त्या स्थानिक भगवंतराव महाविद्यालयात सोमवार 14 डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा तथा खासदार शरदचंद्र पवार यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित “प्रतिभावंत गुणगौरव” या ब्रीदवाक्याखाली महिला शिक्षिकांच्या सत्कार समारंभाच्या सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या.

यावेळी मंचावर उदघाटनस्थानी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आशाताई पोहणेकर होते, तर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सारिका गडपल्लीवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार, नगर सेवक शैलेश पटवर्धन, अमोल मुक्कावार आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे अध्यक्षीय स्थानावरून बोलतांना शाहीन भाभी हकीम म्हणाल्या की, देश व राज्य सुजलाम-सुफलाम बनवायचे असल्यास महिला व नारी शक्ती मजबूत होणे अत्यावश्यक असून प्रत्येक व विविध क्षेत्रात महिलांनी बेडरपणे पाऊल टाकून महिलांनी विकासाची कास धरावी असे आवाहन केले.

तसेच पुढे, शाहीन भाभी हकीम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरदचंद्र पवार, राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रुपालिताई चाकणकर, आमदार धर्मराव बाबा आत्राम आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांच्या कार्याचे व प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विविध उदाहरणासाहित महिला उन्नतीचे ऐतिहासिक निर्णय व ध्येय धोरणावर प्रकाश टाकून यावेळी मोलाचे मार्गदर्शन केले.

त्यानंतर शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे अनुक्रमे लक्ष्मीबाई कुळमेथे, उमा मडावी, सरोजनी आक्केवार, सुरेखा आत्राम, कमलजीत कौर सलूजा, विभावरी मद्देर्लावार,वंदना वेलेकर, लता बारस्कर, गीता वैरागडे,दीपिका ढवस, मेघना बेड,बेबीताई रामगीरवार,हिराताई झिंगे, अनुराधा लाड,मीना रागीट, मीनाक्षी कुमरे,सुरेखा उके आदी महिला शिक्षिकांचे शाल, श्रीफळ व सन्मानपत्र बहाल करून मान्यवरांच्या शुभहस्ते भावपूर्ण सत्कार करण्यात आले.

विशेष म्हणजे याच वेळी आशा वर्कर रूकसार शेख नजीकच्या महागाव आरोग्यवर्धिनी केंद्रातून उत्कृष्ट कामगिरी केल्याने राज्यातून सातवा क्रमांक पटकाविल्याने रूकसार व त्यांचे पती मुस्ताक या शेख दांम्पत्यांचे शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सारिका गडपल्लीवार यांनी तर सूत्रसंचालन सुरेंद्र अलोने यांनी केले. उपस्थितांचे आभार पदमा संगोजी यांनी मानले. यावेळी शिक्षिका व महिला भगिनी उपस्थित होते.