तुकूम येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यस्मरण कार्यक्रम संपन्न

26

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

चंद्रपूर(दि.16डिसेंबर):- ग्रामगीता गुरुदेव सेवा मंडळ तुकुम चंद्रपूर ह्या शाखेच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५२ व्या पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन खनके लेआऊट ओपन स्पेस येथे करण्यात आले होते.सामाजिक अंतर पाळत छोटेखानी स्वरूपात ह्यावर्षी विविध कार्यक्रमाचे नियोजन केले होते . ह्या एक दिवसीय कार्यक्रमात सामुदायीक ध्यानपाठ, परिसरातील स्वच्छता अभियानानंतर सुमित्रा नगर, द्वारका नगरी, खनके लेआऊट ह्या महिला शाखेच्या वतीने राष्ट्रसंताच्या प्रबोधनपर भजनाचा कार्यक्रम पार पडला.त्यानंतर सायंकाळी श्रद्धांजली, सामुदायिक प्रार्थना,आरती, राष्ट्रवंदना , जयघोष घेऊन कार्यक्रम समाप्त करण्यात आला.सेवाकार्याचा गौरव म्हणून मंडळातर्फे ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर आणि नगरसेवक सुभाष भाऊ कासनगोट्टूवार यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे निमित्ताने बंडोपंत बोढेकर , सुभाष कासनगोटटुवार यांची भाषणे झालीत. प्रमुख अतिथी म्हणून मध्यवर्ती प्रतिनिधी विजय चिताडे , ग्रामसेवाधिकारी धर्माजी खंगार , ह.भ.प.आण्याजी ढवस , पुरुषोत्तम सहारे, मंजुश्री कासनगोट्टूवार, वृषाली धर्मपुरीवार, प्रतिभा रोकडे , ‌प्रज्ञाताई गंदेवार म्हणून उपस्थित होते.

शाखेचे गोकुलदास पिंपळकर, मारोती राजुरकर,ॲड.वासुदेव खेळकर, नानाजी सरोदे, अंकुश पायघन, चंद्रभान बेसेकर, लहु पायघन, बाबुराव ढवळे, ज्योती आस्कर, माधुरी बोडेकर, कामीनी वैरागडे, संगिता खंगार, रेखा काकडे,शारदा उताने, तारा राजुरकर, नंदा पिंपळकर, विणाताई खेळकर, लता डोके, ज्योती भेंडाळे, सरोदे ताई, मोरे ताई, ममता गटलेवार, बलकी ताई आदींनी मोलाचे सहकार्य केले.प्रास्ताविक आण्याजी ढवस, संचालन विजय चिताडे व आभार धर्माजी खंगार यांनी मानले.