तीन महिन्यांपूर्वी दफन केलेले आईचे प्रेत काढून केला तिच्या इच्छेनुसार दफनविधी

28

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)मो:-9403277887

मनमाड(दि.18डिसेंबर):- आजच्या युगात नात्यांमधला दुरावा वाढतच असून आपल्या आई वडिलांनी अनेकांना सोडून दिल्याच्या बातम्या आपण अनेकदा बघत असतो. पण आईच्या प्रेमा पोटी आणि आईची अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी एका मुलाने तीन महिन्यांपूर्वी दफन केलेला प्रेत काढून आईच्या इच्छे प्रमाणे त्याचा दफन विधी केल्याची घटना मनमाड शहरात घडली. यामुळे शहरात या विषयी चर्चेला उधान आले होते.

मनमाड शहरातील रहवासी सुहास वसंतराव श्रीरसागर यांच्या आई मंजुलता यांची तब्बेत गेल्या तीन महिन्यापुर्वी बिघडल्याने त्यांना मालेगाव येथे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले .त्यांना निमोनियाचा त्रास असल्याचे सुहासच्या आईला मालेगावच्या कोविड सेंटर मध्ये दाखल करून त्यांचा स्वब घेण्यात आला .स्वबच्या रिपोर्ट येण्याअगोदर मंजुलता यांचे निधन झालं कोरोना रिपोर्ट न आल्याने त्यांना कोरोना संशयित मानून त्यांचा दफन विधी मालेगाव येथील ख्रिस्ती कब्रस्तान मध्ये करण्यात आले.

आपल्या परिवारातील सर्व लोकांचा दफन विधी हा राहत असलेल्या मनमाड मध्ये झाला आहे आणि आईची अंतिम इच्छा ही होती की, त्याचा दफन विधी ही मनमाड ला करावा पण ते न झाल्याने सुहास यांना करमत नव्हते , दोन दिवसानंतर सुहास यांच्या आई मनजुळता यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर सुहास आपल्या आईची इच्छा पूर्ण करण्याचे ठरवले आईचा कबरीतला देह मिळावा म्हणून महानगरपालिका प्रशासनाकडे अर्ज केला. अर्ज पाहून प्रशासनही चक्रावले. तब्बल पावणे तीन महीने विविध ऑफिसच्या पायऱ्या झिजवल्या.

हा नाही करत शासकीय आणि धार्मिक सर्वच पूर्तता केली असता अखेर आईवरील मुलांचे प्रेम पाहून प्रशासनातील अधिकाऱ्यांनी तब्बल पावणे महिन्यानंतर प्रेत स्थलांतराची परवानगी दिली. आई गेल्याचे दुःख आणि आई जवळ आल्याचा आंनद अशी द्विधा स्थिती मुलांमध्ये होती.
आज सकाळी ८ वाजता मालेगावच्या येथील कब्रस्तानातून पोलीस, शासकीय अधिकारी, ख्रिस्ती धर्म मंडळीं, पंचांच्या समक्ष मंजूलताबाईंचा कबरीत दफन केलेली मृतदेहाची शवपेटी विधिवत काढण्यात आली. तेथून शवपेटी मोटारीने मनमाडला आल्यानंतर येथील ख्रिस्ती कब्रस्तानात विधिवत त्याच उपस्थित मंडळींच्या समक्ष पुन्हा कबरीत दफन करण्यात आला.

या कार्यामध्ये सुहासला मालेगावचे आयुक्त कापडणीस, तहसीलदार चंद्रजित राजपुत, तलाठी शरीफ शेख, समाजसेवक फिरोज शेख,नाजिम, माजी आमदार आसिफ शेख, नगरसेवक शकील बेग,असलम अन्सासारी, अॅड जावेद शेख, अॅड फरीदा, याकुब शहा तसेच विषेश सहकार्य ख्रिस्ती कब्रस्ताना मध्ये मुस्लिम समाजाच्या मुस्लीम मौलांनी कबर खोदण्याचा कामात मयताची पेटी काढुन स्वत : ची रुग्णवाहीकीकेने विनामुल्य मनमाड ख्रिस्ती कब्रस्तान मध्ये पोहचवण्यात मदत केली .