पानगाव येथील चैत्य स्मारकास तिर्थक्षेत्राचा “ब” दर्जा देण्यात यावा यासाठी पानगाव चैत्य स्मारक समितीने सामाजिक न्यायमंत्री यांच्या कडे दिले निवेदन

26

‌‌✒️नवनाथ पौळ(केज,तालुका प्रतिनिधी)मो:-8080942185

अंबाजोगाई(दि.21डिसेंबर):-दि २१ रोजी मौजे पानगांव ता. रेणापूर जिल्हा .लातूर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्य स्मारक ” का” वर्गाचे नोंदणीकृत तिर्थक्षेत्र आहे.
पानगाव या ठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थी आहेत.त्याकरिता संस्थेने ३एकर १३गुंठे जमिण खरेदी केली आहे त्या ठिकाणी लातूरचे पालकमंत्री ना. अमित भैया देशमुख यांच्या प्रयत्नामुळे ५कोटी ७४ लाखा चे स्मारक आकारास येत आहे.मुंबई, नागपूर नंतर पानगांव येथेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थी आहेत.

पानगाव येथे दरवर्षी मराठवाडा, आंध्र प्रदेश व कर्नाटक या विविध राज्यातून १० लाखांच्या घरात अनुयायी दर्शनासाठी येतात . सदरील पवित्र स्थळी येणार्या लाखो अनुयायी लोकांची सोय व्हावी त्यांना सोयी सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी शासनस्तरावर दखल घेत चैत्य स्मारकाच्या विकासाच्या दृष्टीने चैत्य स्मारक तिर्थक्षेत्राला “ब” दर्जा मिळणे महत्त्वाचे आहे. याकरिता आज रोजी संस्थेच्या वतीने परळी येथे महाराष्ट्र राज्याचे सन्मानिय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री मा.ना.धनंजय मुंडे यांना विविध मागण्यांचे निवेदन देऊन स्मारकाच्या विकासाबाबत चर्चा करुन विनंती करण्यात आली .
सदरील मागण्या पुढीलप्रमाणे अशा की,

१) महिला व पुरुष यांचे मोठे सुलभ असे स्वच्छतागृह बांधणे.२) दोन मोठे सांची गेट बांधणे.३)सांडपाण्यासाठी अंतर्गत नाली बांधणे.४)दोन वाॅचमंन रूम बांधण्यात यावी.५) अण्णाभाऊ साठे चौक ते चैत्य स्मारकापर्यंतचा दुभाजक रस्ता त्वरीत करणे.६) चैत्य स्मारक व परिसरात लाईटची व्यवस्था तात्काळ करणे.७) चैत्य स्मारकाचे गार्डन व इतर भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात आणि चैत्य स्मारकाला बाजार समितीची पाच एकर जमीन उपलब्ध करून देण्यात यावी. इत्यादी मागण्यांचे निवेदन देण्यात आले यावेळी संस्थेचे अध्यक्ष व्ही.के आचार्य,एम.बी.कांबळे,बी.एस,आचार्य,एम.एम.आचार्य,एस.के.आचार्य,एम.के,आचार्य,ए.डी.दांडे,एक.यू . आचार्य,व्ही.एम . आचार्य,आर.एल.कासारे, बी.पी.आचार्य,एम.जी.वाघमारे इत्यादी मान्यवरांच्या निवेदनावर स्वाक्षर्या आहेत.