सफाई रोजंदारी कामगारांवर बेरोजगारीची कुल्हाळ कोसळणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करा

28

🔸अखिल भारतीय मजूर कामगार संघटना शिष्ट मंडळाची सहाय्यक आयुक्त यांना निवेदनातून मागणी

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.22 डिसेंबर):-येथील नगर परिषद कार्यालया अंतगर्त येणाऱ्या घनकचरा व्यवस्थापना तील सफाई रोजंदारी कामावर गेल्या ऑगस्ट 2020 पासून बेरोजगारीची कुल्हाळ कोसळणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करा. अशी मागणी न.प. सफाई मजूर कॉंग्रेस शिष्टमंडळ पदाधिकारी यांनी चर्चा करून सहाय्यक आयुक्त यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, ब्रम्हपुरी नगरपरिषद अंतर्गत घनकचरा व्यवस्थापनाचे, रोड सफाई व कचरा संकलित गाडीचे कंत्राट तथागत सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थेला देण्यात आले. सदर गेल्या ऑगस्ट 2020 च्या लॉक डाऊन च्या काळात कामगारांना मास्क व ईतर आवश्यक साहित्य पुरविण्याची मागणी केली.

त्यावेळी कंत्राटदाराने बालगंधर्व बेदरे, दीपक मसराम , अमीर सूर्यवंशी , राहुल आंबोरकर, भरत राऊत, चंद्रकला धनविज या कामगारांना कुठलेही पूर्वसूचना न देता कामावरून काढून टाकले व आजपावेतो त्यांना पूर्ववत केले नाही. सदर कामगारांना बेरोजगारीचे संकट कोसळले आहे. त्यांचेवर अमानुष अन्याय झाला आहे. या संदर्भात न.प.मुख्याधिकारी व प्रशासन यांचे सोबत कामगार व संघटनेने वारंवार चर्चा, अर्ज, विनंती केली. मात्र प्रशासनाने कायमचा कानडोळा केला.

त्यामुळे संतप्त कामगार व अ. भा .सफाई मजूर कॉंगेसचे पदाधिकाऱ्याचे शिष्टमंडळ यांनी सहाय्यक कामगार आयुक्त, चंद्रपूर यांचेशी चर्चा केली व सबंधित कामगारांना पूर्ववत कामावर रुजू करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून दिली आहे.

निवेदन देते वेळी अ.भा.सफाई मजूर कामगार कॉंगेसचे राज्य सहसचिव मा.राजेश रणशूर, कामगार नेते गोवर्धन काळे, शेतकरी व कामगारांचे नेते विलास गोदोळे, कामगार प्रमुख बालगंधर्व बेदरे ता. अध्यक्ष, दिपक मसराम कार्याध्यक्ष, राहुल आंबोरकर, भरत राऊत, अमीर सूर्यवंशी, चंद्रकला धनविजय व ईतर कामगार उपस्थित होते.