वाळू माफियांशी एकटा वाघ दत्ता जाधव भिडला

37

✒️नवनाथ आडे(गेवराई प्रतिनिधी)मो:-9075913114/9404223100

गेवराई(दि.24डिसेंबर):-तालुक्यातील कोपरा येथे सिंधफणा नदीपात्रात युवा नेते दत्ता जाधव पाच दिवसापासून चालू होते. नदीपात्रात बीड जिल्ह्यातील पाच दिवस उपोषण हे पहिल्यांदा झाल्याने. या आंदोलनाला प्रशासन हाद्दरले कडाक्याच्या थंडीत उपोषण केलेल्या एकटा वाघ दत्ता जाधव यांनी बीड जिल्हा प्रशासन हादरावले कोपरा येथील जप्त वाळूसाठा फेरलिलाव करावा व वाळू चोरी प्रकरणी चौकशी करून योग्य ती कारवाई करावी या मागणीसाठी सिंधफणा नदीपात्रात उपोषण आले. परंतु हे कडाक्याची थंडी असताना ही केल्यामुळे बीड जिल्ह्यात या उपोषणाची मोठी चर्चा सुरू झाली आहे.

तसेच या उपोषणाला खूप मोठा प्रतिसाद व वर्तमानपत्रात प्रसिद्ध मिळाल्याने जिल्हा प्रशासन हादरले उपोषणकर्त दत्ता जाधव यांनी मागणी केल्याप्रकरणी प्रशासनाकडून चौकशी व कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्या नंतर उपजिल्हा रुग्णालय गेवराई येथे यावेळी तहसील गेवराई प्रतिनिधी श्रीमंत काळे, प्रसाद येळापुरे, सुनील ठोसर, धनंजय गुंदेकर, दत्ता प्रभारे, नितीन राऊत, सतिश झिरपे , सुरेश लाखे, सुमंत लाखे, योगेश लाखे, आदी उपस्थित होते. या पुढे वाळू वाहतुकीमुळे ज्या ग्रामीण रस्ते खराब होतील . त्याला तात्काळ जिल्हा अधिकारी यांनी निधी द्यावा, या करिता लढा चालू राहिल असे दत्ता जाधव यांनी सांगितले आहे