आरोग्य केंद्राकडे जाणा-या रोडवरील खड्डा बनला मृत्यूस आमंत्रण

30

✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो:-9970631332

बिलोली(दि.25डिसेंबर):- तालुक्यातील कुंडलवाडी येथील जोड मारोती ते प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणा-या मुख्य भररस्त्यावर मध्यभागी खुपच भला मोठा खड्डा पडला असुन या रस्त्यावर जि.प.हायस्कुल,के.प्रा.कन्या शाळा,मंगल कार्यालय,बाजार समिती,प्राथमिक आरोग्य केंद्र,रेस्ट हाऊस,हे मुख्य मार्ग असल्यामुळे या रस्त्यावर भला मोठा खड्डा पडल्यामुळे पादचारी व वाहन चालकांचा मोठा वर्दळ असल्यामुळे या रस्त्यावरील रहदारीपेक्षाही पादचारी वर्गाचा सतत ये- जा चालु राहते.

गेल्या दोन चार महिन्यापासुन या सीमेंट रोडवरील नालीचे आवरण फुटून गेल्याने हा खड्डा तयार झाला.दि.23/12/2020 रोजी याच खड्ड्यात टेंपोचा चाक अडकल्याने चालकाचा व आजुबाजूच्या नागरीकांचा सतर्कतेचे मोठा अपघात होता-होता टळले असुन दुर्दैवाने जीवितहानी टळले असुन वाहन चालकाचे नुकसान झाले आहे.असे अनेक वेळा अपघात झाले असुन अजुन किती जीेवे जाईपर्यंत नगरपालीका वाट पहानार आहे.असे संताप वाहन चालक व पादचा-यांतुन व्यक्त होताना दिसुन येत आहे.आता तरी नगरपालीका जागरूक होऊन खड्डा बुजवितील का अशी चर्चा सर्व सामान्या जनतेतुन होत आहे.