✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड-माण)मो:-9075686100

म्हसवड(दि.29डिसेंबर):-फुले शाहु आंबेडकरी चळचळीतील, तालुक्यामध्ये गायनाच्या माध्यमातुन प्रबोधनकार, भिमशाहीर शिवाजी नामदेव जगताप (भाऊ) यांचे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पाश्चात भाऊ२, बहीन३, मुले3, नातवंडे आहेत. जलदानविधी रविवार दि.३-१-२०२१रोजी ठिक ९:०० वाजता राहते घरी विसापुर,ता.खटाव,जी.सातारा या ठिकाणी आहे.

शोककुल जगताप परिवार व ग्रामस्थ विसापुर
जगताप भाऊंनी आपल्या आयुष्यात बुद्ध फुले शाहू आंबेडकर चळवळीसाठी आपले आयुष्य वेचले आज एक चळवळीतला निष्ठावंत कार्यकर्ता आपल्यातून निघून गेल्याचे दुःख कार्यकर्त्यांनी बोलून दाखविले भाऊंनी आपल्या दहिवडी या मूळ गावची जमीन बुद्धविहारासाठी अल्प मोबदल्यात देऊन एक समाजाला दिशा देण्याचे कार्य केले आहे त्यांना संपूर्ण जिल्ह्यातून आदरांजली वाहण्यात येत आहे.भाऊंचे चळवळीतील कार्य कायम समरणात राहणारे असेच आहे

महाराष्ट्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED