सौ. छायाबाई कैलास बोरसे यांनी मनाच्या मोठेपणा

36

🔸वडली ग्रामपंचायत सदस्य झाले बिनविरोध

✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)मो:-9075716526

शिंदखेडा(दि.31डिसेंबर)::- तालुक्यातील वडली ग्रामपंचायतीत इतिहास घडवत गावातील गटतट एकत्र करून कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसणारे सदस्य घेऊन सौ छायाबाई कैलास बोरसे यांची गावाची निवडणूक बिनविरोध केली..

गावाच्या विकासासाठी कोणतीही राजकीय इच्छा नसतांना फक्त गाव एकत्र येईल व गावात शांतता राहील यासाठी खास लोकाग्रहास्तव सदस्य पदाची धुरा सांभाळण्यासाठी सौ. छायाबाई कैलास बोरसे तयार झाल्यात त्याबद्दल ताईचे खूप खूप अभिनंदन..

संपूर्ण परिवाराची निवडणूकीची इच्छा नसतांना फक्त गावाच्या भल्यासाठी सौ छायाबाई कैलास बोरसे यांनी मनाच्या मोठेपणा दाखवला व सदस्य पद स्वीकारले त्याबद्दल सर्व वडली गावातर्फे जाहीर आभार व हार्दिक अभिनंदन शुभेच्छा.