सार्वजनिक (शासकिय) कार्यालयात अभ्यांगताना अभिप्राय फार्म ठेवण्याबाबत अधिकारी वर्ग उदासिन

32

🔹शासकिय परिपञकाला केराची टोपली

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

बुलढाणा(दि.31डिसेंबर):- सरकारी काम व सहा महिने थांब ही महाराष्ट राज्यामधील नागरिकाना शासकिय कार्यालयात कामासाठी चकरा मारल्यानंतर येणार्‍या अनुभवावरुन पडलेली एक म्हण आहे माञ नागरिकाना होणारा ञास कमी होवो म्हणुन महाराष्ट शासन सामान्य प्रशासन विभाग यांनी दिंनाक 23-11-2016 रोजी परिपञक क्र. संकिर्ण 2016/प्र.क्र.(204/16)सहा. मंञालय मुंबई 400032 यांनी परिपञक काढुन प्रत्येक सार्वजनिक प्रधिकरणाने अभ्यांगताना अभिप्राय फार्म ठेवन्यात यावे असे सुचित केले व सदर फार्म तिन महिन्याला संबधीत अधिकार्‍यासमोर उघड करन्यात यावे.

व सदर कर्मचारी ,अधिकार्‍याची जनतेबरोबरची वागणुकीबाबत त्याच्या गोपनिय अहवालात मुल्यमापन करण्यासाठी वापरण्यात यावे असे आदेश मा. राज्या माहिती आयुक्त कोकण खंडपीठ यांच्या आदेशाच्या अनुषंगाने सर्व विभागाना सुचित करावे त्यामुळे सदर परिपञक शासनाने काढले माञ महाराष्ट शासनाच्या कोणत्याही विभागात अभिप्राय ठेवल्या जात नाही ही एक खेदाची बाब आहे कारण जनतेला ही बाब जनतेला कडु न देण्याची दक्षता अधिकारी वर्ग घेत असतो असे ना ईलाजाने लिहावे लागते असो यापुढे तरी नविन वर्षापासुन तरी शासनाने याबाबत टि.व्ही. वृतपेपरच्या माध्यामातुन जागृती करावी ही अपेक्षा