✒️महादेव उप्पे(देलगुर प्रतिनिधी)मो.नं.९४०४६४२४१७

देगलूर(दि.5जानेवारी):-तालुक्यातील हाळी जिल्हा परिषद शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.कोरोनाच्या भितीपोटी शाळेतील विद्यार्थ्यांना सोसियल डिस्टंसींगच्या आधारे बसवण्यात आले.

या कार्यक्रमास गावातील महिलांचा लक्षणिय सहभाग होता.शाळेच्या वतीने सर्व महिलांचा सत्कार करण्यात आला.यावेळी शाळेतील मुलींनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्रावर भाषणे केली.

या कार्यक्रमाला शालेय शिक्षण व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री हणमंतराव जाधव,जि.प.शाळेचे मुख्याध्यापक मा.संजयजी नाईकवाडे सर सहशिक्षक अराळे सर आदि या कार्यक्रमास उपस्थित होते.

महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED