🔹पशुसंवर्धन उप आयुक्त यांचे आवाहन

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)मो:-9561905573

बुलडाणा(दि.5जानेवारी):- पाळीव प्राणी दुकान नियम 2018 आणि श्वान प्रजनन व विपणन नियम 2017 या नियमातील तरतुदीनुसार राज्यातील पाळीव प्राण्याची दुकाने व श्वान प्रजनन, विपणन केंद्राची महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळाकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे. यापुढे कोणतेही पेट शॉप व डॉग ब्रिडींग सेंटर महाराष्ट्र राज्य प्राणी कल्याण मंडळाकडे नोंदणी केल्याशिवाय सुरू करू नये.

अशा सुचना पशुसंवर्धन विभागाने दिलेल्या आहेत. त्याची अंमलबजावणी करण्यायत येत आहे. सर्व पेट शॉप व डॉग ब्रिडींग सेंटर मालक यांनी लवकरात लवकर आपल्या पेट शॉप व डॉग ब्रिडींग सेंटरची नोंदणी करण्याकरीता जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त बुलडाणा यांचेकडे प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. पी जी बोरकर यांनी केले आहे.

महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED