✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

चंद्रपूर(दि.5जानेवारी):- चंद्रपूर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या 11 विद्यार्थांची एकाचवेळी टाटा कंसल्टेंसी सर्विसेस ह्या नामांकित कंपनी साठी कॅम्पस प्लेसमेंटद्वारे निवड झाली आहे .शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय चंद्रपुर येथे दरवर्षी कैंपस प्लेसमेंट चे आयोजन केले जाते. या वर्षी सुद्धा टाटा कंसल्टेंसी सर्विसेस ह्या कम्पनी साठी प्लेसमेंट ड्राइव चे आयोजन करण्यात आले होते.

या कंपनी साठी महाविद्यालयातील सर्व अभियांत्रिकी शाखेच्या मुलानी सहभाग घेतला होता. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय चंद्रपुर येथील 2021 मधील अंतिम वर्षाचे विद्यार्थी सागर भराड, सिद्धांत घुंगरूडकर, अनिल शर्मा, अभिषेक बोपचे, अंकित राजुरकर, मुकुल रॉय, प्रज्योत खडसे, साईं बोल्लमवार, अनमोल सिंघ, सूरज गेडाम, अनिकेत राउत या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे.

महाविद्यालयात टाटा टेक्नोलॉजी लिमिटेड पुणे द्वारा भव्य संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रे उभारण्यात आली आहेत. या केन्द्राद्वारे सुद्धा विद्यार्थांना प्रशिक्षण तसेच रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होतील. निवड झालेल्या या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुधीर आकोजवार, यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असल्याचे कळविले आहे.

चंद्रपूर, महाराष्ट्र, विदर्भ, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED