शेतकरी बांधवांचे जीव जात असताना प्रशासन गप्प का- सुनील ठोसर

    84

    ?अद्याप गुन्हाच दाखल नाही..

    ✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114/9404223100

    गेवराई(दि.6जानेवारी):-पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झाल्यानंतर आर रामस्वामी हे काहीतरी चांगलं करून कायद्याचा धाक निर्माण करतील ही अपेक्षा फोल ठरली आहे.गंगावाडी येथे वाळूच्या हायवाने शेतकऱ्याला चिरडून टाकल्याच्या घटनेला ५० तास होऊन ही गेले तरी अद्याप या प्रकरणी गुन्हाच दाखल झालेला नाही. हा प्रकार म्हणजे आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न तर नाही ना अशी शंका आता येऊ लागली आहे .गेवराई तालुक्यातील गंगावाडी येथे सोमवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या हायवाने रुस्तुम मते या 65 वर्षीय शेतकऱ्याला चिरडून टाकले.

    या शेतकऱ्याच्या शरीराचे अक्षरशः तीन तुकडे झाले .ग्रामस्थांनी दुपारपर्यंत आंदोलन केल्यानंतर कारवाईचे आश्वासन देत पोलीस आणि महसूलच्या लोकांनी आपला दगडाखलचा हात काढून घेतला .मात्र पोलिस असो की महसूल ची यंत्रणा किती गेंड्याच्या कातडीची असते याचा अनुभव या प्रकरणी पुन्हा एकदा आला. ही हृदयद्रावक घटना घडल्यानंतर तातडीने गुन्हा दाखल होऊन संबंधित वाहन, वाहन चालक, वाहन मालक यांना अटक होणे आवश्यक होते. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे मंगळवारी दुपारी दोन तीन वाजेपर्यंत या प्रकरणी गुन्हाच दाखल झाला नव्हता.