खासगीकरणाचा आनंद आणि दुष्परिणाम

27

भारतावर परकीय लोकांना राज्य करणे सोपे का आहे तर भारतातील लोक हुशार आहेत पण मेंदुचा वापर कमी करत असल्याने दुरदृष्टीचा अभाव आहे. आणि ज्यांच्या कडे दुरदृष्टी आहे त्यांना नेहमीच डावलून दुर्लक्षित करण्यात आल्याने भारताचा इतिहास बघितला तर भारत गुलामीतच जास्त राहीला आहे. देशावर राज्य करणाऱ्या परकियांनी प्रत्येक वेळी आक्रमक करून च भारत काबीज केला असेही काही नाही. भारतात जी विषमता आणि जातीवाद यामुळे द्वेषाची व विषमतेची व्यवस्था निर्माण करून कोणत्याही परिस्थितीत एक वर्ग सत्तेत वा मोठ्या पदावर राहील या साठी पुर्वी पासून नियोजन केलेले आहे मग परिस्थिती आणि सत्ता कोणाचीही असो. परकीय लोकांच्या गुलामगिरी लाचारीचे जिवन जगणे भारतीय लोकांना पसंत आहे.

म्हणून पारतंत्र्यातही लोक आनंदी राहतात. काही काही लोकांना तर आपण आजही पारतंत्र्यात आहोत याचीच जाणीव नाही. स्वतः चा मेंदू न वापरता दुसऱ्याने सांगितलेल्या अफवेवर सर्वात जास्त विश्वास ठेवणारा व्यक्ती म्हणजे भारतीय माणूस होय. आजही ९५% लोक फक्त अफवेला सत्य समजून जगत आहे. जो अफवा अथवा काल्पनिक बाबीं विषय खर बोलतो त्याला मुर्खात काढतात किंवा विद्रोही बनवतात. खाजगीकरणामुळे देश गुलामीत कसा जातो याचे उदाहरण म्हणजे इस्ट कंपनी व्यापाराच्या उद्देशाने भारतात आली आणि बघता बघता भारताला गुलाम बनवून कसे टाकले हेच कळाले नाही. बघता बघता संपूर्ण भारतावर इस्ट इंडिया कंपनीची सत्ता स्थापीत झाली.

सांगायचे तात्पर्य गुलामीकडे जाण्याचा पहीले लक्षण म्हणजे खाजगीकरण होय. खाजगीकरणामध्ये मुलभूत हक्क व आधिकारांचे हनन होऊन, नागरिकांना फक्त गूलाम म्हणून बघितले जाते आणि तशी त्याला वागणूक दिली जाते. ज्यांच्या कडे दूरदृष्टी नाही वा ज्यांना राष्ट्राबद्दल आपुलकी नाही असेच लोक खाजगी करणाचे जल्लोष करून आनंदाने स्विकार करतात. खाजगीकरण आणि सार्वजनिक अर्थात सरकारी यामध्ये काय फरक आहे हे सुशिक्षित लोकांना याची जाणीव नाही. म्हणून लोक खाजगीकरणाचा हसत हसत स्विकार करून सार्वजनिक मालमत्तेची हानी आणि देशाचे नुकसान करतात.

आज सर्वच सार्वजनिक क्षेत्र खाजगीकरणामध्ये गेले आहे. बोटावर मोजण्या इतक्या लोकांना खाजगीकरण व त्याचे दुष्परिणाम माहिती आहेत बाकिच्या लोकांचे काय? खाजगीकरणाची झळ सोसत असताना सुद्धां खाजगीकरण फायद्याचे आहे की तोट्याचे आहे हे कळत नसेल तर याला काय म्हणावं. टेलिकॉम क्षेत्रात पाय ठेवताना जिओ ने एक वर्षे नेट फ्री देऊन ग्राहकांना आकर्षित केले. अनेक ग्राहक जिवो शी जुळल्या गेले, लोकांना सवय झाली आणि आज जिओ सर्वात महाग आहे. भारतीय लोक कोणताच विचार करत नाहीत, काही दिवस वापरून सिम कार्ड फेकून देऊ इथपर्यंत विचार सरणी असलेल्या लोकांमुळे आज जिओ नंबर एक वर आहे. उद्योजक कोणतीही वस्तु वा सेवा कधिच मोफत देत उलट दिलेल्या च्या बदल्यात जास्त वसुल कस करायचे याचे नियोजन अगोदरच असते. सुरवातीला हवे हवेसे वाटणारे आज खिशाला परवडणारे नाही.

याचे कारण समोरचा विचार करण्याची मानसिक कुवत नाही. हीच परिस्थिती शिक्षण, नोकरी, वाहतूक, या विषयी झाली आहे. खाजगीकरण ही संकल्पना आली आणि देश अधोगती कडे जायला सुरवात झाली. शिक्षणामध्ये खाजगीकरण आले. मोफत आणि सक्तीचे शिक्षण देण्याची जबाबदारी सरकारची आहे असा कायदा असताना सुद्धां मुलांना केजी, ज्युनिअर केजी सिनिअर केजी यामध्ये हजारो रुपये देऊन प्रवेश घेतला जातो. माझं मुल कॉनव्हेट मध्ये शिकायला जाते याच खुप गर्व पालकांना असते पण त्याच्या फायदे तोट्यांचा कुठे च विचार नसतो. सरकारच्या बालवाड्या असायच्या मोफत प्रवेश, रोज रोज गाणे गाऊन व कथा सांगुन मुलांना शिक्षणामध्ये आवड निर्माण केली जायची. ती गोष्ट केजी मध्ये मिळत नाही. पहिल्या वर्गापासून इंग्रजी माध्यम घेऊन मुलांना शाळेत प्रवेश दिला जातो, घरी कोणाला ए बी सी डी माहिती नाही तरी मुलगा इंग्रजी शाळेत. पाचव्या सहाव्या वर्गात मुलगा गेला की जवळचा पैसा संपून जातो. दहावी बारावी नंतर खाजगी मध्ये शिकवताना पालकाच्या नाकी नव येतात.

ज्यांच्या कडे स्वावर मालमत्ता आहे असे लोक जमीन विकुन मुलांना शिकवतात. लाखो रुपये खर्च करून जेव्हा शिक्षण पुर्ण होते तेव्हा आपण तर शिकलो पण नोकरी च काय. कारण नोकरी सुध्दा खाजगीकरणात कमी पगाराची असते. कमी पगारावर जास्त वेळ काम करावे लागते. शिक्षणाला लागलेला पैसा सुद्धा आपण कमवू शकत नाही. आपण कॉनव्हेट आले कोणताही विचार न करता दुसऱ्याने केले म्हणून आपण सरकारी शाळेतील मुल खाजगी शाळेत टाकून स्वतः चे, मुलाचे आणि अर्थाचे नुकसान करून टाकतात. शासकीय बस ने प्रवास करणे कंटाळवाणे वाटंत पण खाजगी बसने प्रवास करताना खुप आनंद होतो. खाजगीकरणाचा स्विकार आपण हसत खेळत करून अनेक समस्या निर्माण करून ठेवतो. वाहतूक रस्त्याची सुद्धा तिच परिस्थिती आहे. सरकार कडे रस्ते बांधायला पैसे नसतात. मग सरकार खाजगी कंपनीला काम देऊन रस्ते बांधून घेतात. आणि मोठ मोठे टोल नाके उभे करतात. रस्ते खराब होतात, टोलची मुदत संपुन जाते तरी नागरिकांची लुट थांबता थांबत नाही. जे काम कंपनी करू शकते ते काम सरकार का करत नाही? सुरवातीला शासकीय चँनल दूरदर्शन म्हणून होते. परंतु जसजसे खाजगी कंपन्या आल्या आणि दुरदर्शन नामषेश झाले. दुरदर्शन मोफत बघायला मिळायचे परंतु आता दरमहा विशिष्ट शुल्क आकारूनच आपल्या घरातील टिव्ही आपण बघु शकतो. आज शेतजमीन जर खाजगी करणाद्वारे कंपनीकडे गेली तर उपासमार आणि महागाईमध्ये होरपळून मरणाऱ्यांची संख्या करोडोच्या घरात राहील.

खाजगीकरणाचा काही लोकांना सुरवातीला चांगले वाटते. परंतु दुष्परिणाम दिसून येत नाही. आणि खाजगीकरणा शिवाय विषमतावादी व्यवस्था सुद्धा कायम राहु शकत नाही. म्हणून विषमतावाद पसरवून उद्योगपतींच्या हाती सत्ता देऊन पुन्हा पारतंत्र्यात जाण्याची पुर्ण तयारी झालेली आहे.
अशा प्रकारे खाजगीकरणाचा आपण हसत स्विकार केला तरी त्याचे दुष्परिणाम खुप भयावह आहेत. शाळेच्या फी वाढण्याचे, सरकारी नोकरी कमी होण्याचे , कमी पगारावर जास्त काम करण्याचे, दिवसातून फेरी परत टोलनाका अशा अनेक प्रकारे आपल्याकडून खाजगी सेवेच्या नावाखाली नागरिकांचे खिसे रिकामी करून खाजगीकरणाने देशाला आर्थिक मागास केले आहे. सरकारी तिजोरीत जाणारा पुर्ण पैसा खाजगी लोकांकडे गेला आणि भारत देशाची तिजोरी रिकामी करून देशाला कंगाल केले. राष्ट्रीय संपती कंपनीच्या हाती गेली त्यामुळे देशातील जनता भिकेला लागली.

हे सर्व घडले कारण स्वतः ला सुशिक्षित समजणारा वर्ग आपल्या मेंदुने विचार न करता दुसऱ्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवणे, दुरदृष्टीचा अभाव असुन तर्क करण्याची क्षमता नाही. म्हणून खाजगीकरण वाढून दुष्परिणाम दिसून येतो. आता तर ही खाजगीकरणाला सुरवात झाली आहे. येणाऱ्या काळामध्ये शिक्षण, राशन, आरोग्य, नौकरी, सर्व काही खाजगीच असेल आणि ते कोणत्याही सर्व सामान्य मानसाच्या खिशाला परवडणारे नसेल म्हणजे खाजगीकरणामुळे आपण भिकेला लागणार हे नाकारून चालणार नाही. म्हणून आज खाजगीकरणाचा आनंदाने स्विकार केल्या पेक्षा स्वाभिमानाने विरोध जर झाला तर राष्ट्रीय संपती राष्ट्राच्या मालकीची राहील आणि जास्त दुष्परिणाम बघायला मिळणार नाहीत.
*************************************
✒️लेेेखक:-विनोद पंजाबराव सदावर्ते
रा. आरेगाव ता मेहकर
मोबा: ९१३०९७९३००
*************************************