गौतम नगरतील शासकीय जायकवाडी जागेत अतिक्रमण करून राहात आसलेल्या नगरिकांना घरकुल योजनेचा लाभ घेण्यात यावा -प्रमोद मस्के

30

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.14जानेवारी):-गंगाखेड येथील शासकीय जायकवाडीत जागेत राहत असलेल्या गौतम नगरातील सर्वे नंबर 254, 255, 258 या सर्वे नंबर मधील नागरिकांचे अतिक्रमणे नियमानुकूल करण्यासाठी जायकवाडी विभागाने लवकरात लवकर नहरकत द्यावे तसेच भूमी अभिलेख कार्यालयाने केलेल्या मोजणीची फीस चे पैसे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी भरणा करून त्या नागरिकांना घरकुल आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी व तात्काळ मालकी हक्काचे कबाले द्यावे यासाठी प्रमोद मस्के यांच्या नेतृत्वाखालील दिनांक 11 जानेवारी 2021 रोजी उपजिल्हाधिकारी मा.सुधीरजी पाटील साहेब यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले.

व दूरध्वनीदारें नाहरकत पत्र देण्यासाठी जायकवाडीच्या अधिकारी यांना फोनदारे उपजिल्हाधिकारी यानी बोलले व तसेच जायकवाडीचे भूविकास उपविभागीय अधिकारी साहेब यांना व उपमुख्यधिकारी स्वाती वाकोडे मॅडम यांची भेट घेऊन ही निवेदन देण्यात आले जर दिनांक 20/ जानेवारी 2021रोजी पर्यंत आमची मागणी पुर्ण झाली नाही तर जनआंदोलन उभारणार असा इशारा प्रमोद मस्के ( संस्थापक अध्यक्ष जनशक्ती मित्र मंडळ,गंगाखेड) यांनी दिला.

यावेळी राम साळवे.सिताराम गायकवाड. शेख नजीरभाई. युनुस खान. बबन साळवे. काशिम भाई पठाण. ज्ञानोबा पवळे.शेख अल्लाबकस. रौफ पठाण. अम्रत अवचार. सखाराम पडित. आयुब भाई पठाण. शेख पाशाभाई. लक्ष्मण एंगडे. मतीन सय्यद. निजाम खान.रोहन कांबळे. आकाश साळवे. सागर डाके. फिरोज खान. शेख अब्दुल शेख खदीर. खुरेशी इमामसाहाब. सय्यद बाशु. शाम साळवे. शेख जावेद. महादेव पडित. बालाजी लोढे. बाळसकर मामा. सय्यद मकबुल. नुरखा पठाण. अदी नागरिक उपस्थित होते