उमरखेड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्डामध्ये नाम विस्तार दिन साजरा

29

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)मो:-7875157855

उमरखेड(दि.14जानेवारी):-डॉ.बाबासाहेब आंबेडकर वार्डातील सम्यक बौद्ध विहारामध्ये दि.१४ जानेवारी रोजी “डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाम विस्तार दिन” साजरा करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष कुमार केंद्रेकर (अध्यक्ष शांतीदूत समिती,उमरखेड) हे होते. यांनी आपल्या मनोगतात सन१९७८ ला सरकारने मराठवाडा विद्यापीठाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचा ठराव मंजूर केला होता पण तत्कालीन मनुवादी लोकांनी याला विरोध केला. यानंतर १७ वर्षांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव सन१९९४ ला मराठवाडा विद्यापीठाला देण्यात आले. पण या मागील १७ वर्षात अनेक आंदोलने झाली. कित्येक मागासवर्गीयांचे घरे जाळण्यात आली. मागासवर्गीय मुलींवर अत्याचार करण्यात आले, बरेच जागी पाणवठे करण्यात आले.नांदेडचे शहीद गौतम वाघमारे यांचे आत्मदहन याबद्दल कुमार केंद्रेकर यांनी सविस्तर माहिती दिली.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भन्ते किर्ती बोधी,हिराबाई दिवेकर,शांताबाई दिवेकर, जिजाबाई दिवेकर, जानकाबाई इंगोले,यशोधरा धबाले,सुभाबाई पाईकराव,यशोदाबाई दिवेकर,भारताबाई दिवेकर,उषाताई इंगोले, आनंदाबाई दिवेकर, कु.शुभांगी इंगोले, कु. बौद्धवी धबाले, शंकरराव दिवेकर (माजी सैनिक) मारोती दिवेकर,संतोष इंगोले,तुषार पाईकराव,मनोज इंगोले ,माही धुळेकर, बुद्धभूषण इंगोले,दिलीप मुनेश्वर व लहान बालक बालिका आणि रमामाता महिला मंडळ, शांतीदुत समिती,भीम टायगर सेना यांचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिध्दार्थ दिवेकर (शहर अध्यक्ष भीम टायगर सेना,उमरखेड) यांनी केले तर आभार प्रफुल दिवेकर यांनी मानले.