अखेर त्या वयोवृद्ध दिव्यांग आजी बाईची बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समीतीने घेतली दखल

🔸वयोवृद्ध दिव्यांग आजीने संघर्ष समीतीच्या शिष्टमंडळाचे अश्रुरूपी मानले आभार

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नांदेड(दि.15जानेवारी):- बर्याच दिवसांपासून सोशल मीडियावर एका वयोवृद्ध दिव्यांग आजीबाईची तुटकि खुडची घेऊन ये – जा करतांनाची पोस्ट व्हायरल झाली होती परंतु प्रत्यक्षात त्या आजी बाईंसाठी कोणाकडुनच मदतीचा पाझर फुटला नव्हता तेंव्हा सतीश पाटिल हिवराळे यांनी बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समितीचे अध्यक्ष राहुल सिताराम साळवे यांच्या आजवरच्या विविध सामाजिक कार्याचा आढावा घेत थेट फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधत सदरील गोरगरीब वयोवृद्ध दिव्यांग आजीबाई विषयी कळविले आणि ज्या प्रमाणे आपण ईतर सर्व शेकडो दिव्यांगांना न्याय हक्क मिळवून देता त्याच प्रमाणे या वयोवृद्ध दिव्यांग आजीबाईंना सुद्धा मदत करावी अशी विनंती केली.

असता राहुल साळवे यांनी सतीश पाटिल हिवराळे यांच्या शब्दाचा मान ठेवत मुखेड येथील तालुका अध्यक्ष देविदास ऊर्फ पिंटुदादा बद्देवाड यांना सदरील वयोवृद्ध दिव्यांग आजीबाईंबाबत कळविले असता देविदास बद्देवाड यांनी कुठलीच दिरंगाई न करता वाॅकर स्टॅण्ड घेऊन ठेवले आणि मकर संक्रांतीचे अवच्युत्य साधत दि 14 जानेवारी 2021 रोजी जिल्हा अध्यक्ष राहुल साळवे यांच्यासह परमेश्वर शेटवाड, राजकुमार देवकर आणि कार्तिक भरतीपुरम यांना आपल्या वाहनाद्वारे स्वखर्चाने तुपदाळ खुर्द तालुका मुखेड गाठले.

त्या गावी जाताच सतीश पाटिल हिवराळे यांनी शब्दाचा मान ठेवत आलेल्या सर्व दिव्यांग शिष्टमंडळाचे शाल,श्रीफळ देत पुष्पहार घालून स्वागत केले आणि त्या वयोवृद्ध दिव्यांग आजीबाईंना श्रीमती गिरीजाबाई तुळशिराम पिठलेवाड यांना सर्व गावकर्यासमवेत आणलेले वाॅकर स्टॅण्ड दिले तत्पुर्वी राहुल साळवे यांच्यासह आलेल्या देविदास बद्देवाड, परमेश्वर शेटवाड, कार्तिक भरतीपुरम आणि राजकुमार देवकर यांनी वयोवृद्ध दिव्यांग आजीबाईंना तिळगुळ देऊन चरणस्पर्श आशिर्वाद घेतला.

यावेळी आजीबाई भाराळुन गेल्या होत्या त्यांना आनंदाश्रु अनावर झाले होते डोळ्यात पाणी घेऊन आणि आनंद व्यक्त करून त्यांनी सर्वांचे आभार मानले आणि दिलेले वाॅकर स्टॅण्ड घेऊन थेट आपल्या घराकडे आनंदात धावली.या उल्लेखनीय कार्याबद्दल डाॅ.सचिन पाटिल बोडके आणि सतीश पाटील हिवराळे यांच्यासह सर्व गावकर्यांनी बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाचे कौतुक करत आभार मानले.

नांदेड, महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED