जेएनयू मध्ये पीएचडी करणारा आणि नागपूर हायकोर्टाचा वकील झाला ग्रामपंचायत मेंबर

34

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

मूल(दि.18जानेवारी):- दिल्लीतील आंतरराष्ट्रीय जवाहर नेहरू विद्यापीठातून पीएचडी पदवी घेणारा, अमेरिकेतील विद्यापीठातून शिक्षण घेणारा आणि नागपूर हायकोर्टात वकिली करणारे डॉक्टर कल्याण कुमार हे चितेगाव च्या ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्य म्हणून निवडून आले आहे. इतके उच्च विद्याविभूषित शिक्षण घेणारे कदाचित जिल्ह्यातील हे पहिलेच ग्रामपंचायत सदस्य आहेत.

एल्गार प्रतिष्ठान चे माध्यमातून सामाजिक काम करणारे डॉ. कल्याण कुमार हे चितेगाव ग्रामपंचायतचे मतदार आहेत. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत गावकऱ्यांनी त्यांना अविरोध निवडून देण्याची तयारी दर्शविली, त्यामुळे ते ग्रामपंचायत निवडणुकीत सहभाग घेण्याची तयारी दर्शविली. मात्र काही राजकीय नेत्यांनी हस्तक्षेप करून निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला.

या निवडणुकीत अॅड. डॉ. कल्याण कुमार वार्ड नंबर १ मधून निवडणुकी रिंगणात उभे राहिले आणि विजयी झाले.
चंद्रपूर जिल्ह्यात येण्यापूर्वी डॉक्टर कल्याण कुमार हे दिल्ली येथील त्रिमूर्ती भवन मध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत होते हे उल्लेखनीय.