दिव्यांगाचे विविध मागण्याचे बेमुदत धरणे आंदोलन

26

🔸न्याय हक्क द्या नसेल तर स्व ईच्छा मरण्याची परवानगी मिळे पर्यंत बेमुदत धरणे आंदोलन

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नांदेड(दि.21जानेवारी):-दिव्यांगाच्या विविध शासकिय योजनेची अंमलबजावणी जिल्हा व तालुकास्तरावर होत नसल्याने दि.24 जानेवारी पासुन बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिव्यांग विकास संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष समीर पटेल व दिव्यांग, वृध्द, निराधार मित्र मंडळ संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे कुंचोलीकर यांनी मा.जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांना निवेदन दिले आहे.

🔸दिव्यांगाच्या प्रमुख मागण्या

दिव्यांग मित्र अॅप नांदेड प्रणालीची काटेकोरपणे जिल्हात अंमलबजावणी करावी. डिसेंबर 2019 मध्ये झालेल्या कृत्रिम अवयव मोजमाप शिबीरातील गरजु दिव्यांग व्यक्तीला पायाभूत साधने व साहित्य तात्काळ द्या. नांदेड जिल्ह्यातील अंत्योदय राशनाचा नविन ईष्टांक वाढ करुन दिव्यांगाला अंत्योदय राशन कार्ड व राशन उपलब्ध करून द्यावे. शासकिय व निमशासकीय कार्यालयात व कार्यालयीन परिसरात स्वयं रोजगारासाठी दिव्यांगाला 200 स्वेअर फुट जागा उपलब्ध करून द्यावी. म.ग्रा.रो.ह.योजने अर्तगत दिव्यांग व्यक्तीला त्यांच्या गावातच किमान शंभर दिवस रोजगार उपलब्ध करुन द्यावा. दिव्यांगाला प्रथम प्राधान्याने घरकुल योजनेचा लाभ द्यावा. दिव्यांगाला व्यवसाय करीता बिज भांडवल योजना मध्ये बॅंक कर्ज उपलब्ध करुन देण्यात यावे. ग्रा.पं, न.पं., न.पा. म.न.पा.,पं.स., जिल्हा परिषद आणि स्थानिक मतदार संघातील आमदार, खासदार राखिव असलेला 5% दिव्यांग निधी दिव्यांगावर तात्काळ खर्च करावा. स्थानिक स्वराज संस्था मध्ये दिव्यांगाला स्वियकृत सदस्य म्हणुन नियुक्ती करण्यात यावी. सर्व शासकीय योजना व तसेच वैयक्तिक लाभाच्या योजनेच्या समित्यांवर दिव्यांग व्यक्तीची सदस्य म्हणुन नियुक्ती करावी.

ईतर विविध सर्व दिव्यांगाच्या मागण्या करीता दि 24 जानेवारी रोजी मा.जिल्हाधिकारी कार्यालयातील समोर न्याय हक्क द्या नसेल तर स्व ईच्छा मरण्याची परवानगी मिळे पर्यंत बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे. तरी या आंदोलनात दिव्यांगानी हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे.असे आवाहन दिव्यांग विकास संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष समीर पटेल व. तसेच दिव्यांग, वृध्द, निराधार मित्र मंडळ संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे कुंचोलीकर यांनी केले आहे. त्यावेळी त्यांच्या सोबत जमीर पटेल, अजिंक्य चव्हाण,फारुख कुरैशी,सुनिल व्यव्हारे,अहेमद भाई, रवी शिरफुले, धुरपत सुर्यवंशी,फहीमोद्दीन सरवरी, रमेश गोडबोले,शब्बीर बेग, बंडू पाटे, शेख इम्रान, महेश चव्हाण, बाबा आली, प्रियंका राठोड, मारोती लांडगे, सलमा शेख, कबिर राठोड,शंकर कदम, दिपक सुर्यवंशी, शेख साजित,आकाश सोनुले,शेख नसिरुद्दीन यावेळी उपस्थित होते….