जोतिबा फुले कर्ज योजने अंतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा – मल्हारी शिवाजी कोकरे

29

🔸जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सोलापूर कुंधण भोळे साहेब यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन

✒️नागेश खूपसे(सोलापूर प्रतिनिधी)मो:-7775096293

सोलापूर(मंगळवेढा)(दि.21जानेवारी):- रा. ब्रम्हपुरी,ता. मंगळवेढा, जिल्हा सोलापूर इथे जोतिबा फुले कर्ज योजने अंतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ विनंती अर्ज करण्यात आले. सदर माहिती याप्रमाणे की, मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूर येथील दिनांक 21/12/2019 या दिवशी बैठक पार पडली होती. त्यात महात्मा जोतिबा फुले कर्ज माफी योजने अंतर्गत दि. 30 सप्टेंबर 2019 पर्यन्त सर्वच शेतकर्‍यांना सरसकट रु. 2 लाख पर्यंतची कर्जमाफी ची घोषणा केली होती 2019 हिवाळी अधिवेशन संपून हिवाळी 2020 चे अधिवेशन संपले तरी अजून शेतकर्‍याची पूर्ण कर्ज माफी झाली नाही. काही ठराविक शेतकर्‍यांनाच कर्ज माफी भेटली आहे.

1 एप्रिल 2015 ते 30 सप्टेंबर 2019 मधील सर्वच कर्ज माफी झाली आहे आणि 1 एप्रिल 2015 च्या आधीचे शेतकरी आहे. आणि दोन लाख रुपये वरील शेतकऱ्यांना अजून कर्ज माफी मिळाली नाही. कारण शासनाचा जी आर 4564136 या नुसार अनेक शेतकरी कर्ज माफी पासून वंचित राहिले आहे शासनाने नवीन जीआर काढण्यात यावा नाहीतर त्या जीआर मध्ये बदल करून जे शेतकरी 1 एप्रिल 2015 चे आधीचे आहे त्यांना कर्ज माफी देण्यात यावी . जे शेतकरी कर्ज माफी पासून वंचित राहिले आहे त्यांना कर्ज माफी मिळावी. मूळ कर्ज थकीत असलेने बँक नव्याने कर्ज देत नसल्यामुळे आणि जमीनदार व शेतकरी यांना ही बँक कर्ज देत नसलेने आणि बँकेचे अधिकारी जमीनदार व कर्जदार यांना जास्त त्रास देत आहेत.
शासनाने जे शेतकरी कर्ज माफी पासून वंचित राहिले आहे त्यांच्यावर अन्याय करू नये. सर्वात जास्त आत्महत्येत 2020 मध्ये झाले आहेत .कारण शासनाने काढलेल्या जीआर नुसार अनेक शेतकरी पात्र ठरत नाही यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत आहेत.आधीच्या सरकारने काही शेतकर्‍यांची कर्ज माफी झाली असेल तरी दीड लाख रुपये माफी करून राहिलेले कर्ज सतत कोरडा दुष्काळ ओला दुष्काळ रोगराई हमी भाव नसलेने या सर्व कारणाने शेतकरी लवकर कर्ज शकला नाही. आणि बँकेचे व्याज नियमित असेल तर 7% व थकीत असलेवर 11% आणि चक्रवाढ व्याज असेलेने बँकेचं कर्ज झपाट्याने वाढत असल्याने शेतकर्‍यांवर कर्जाचा बोजा जास्त झाल्याने आणि बँकेचे सतत फोन येतात त्यामुळे शेतकरी यांना दुसरा पर्याय राहिलेला नाही शेतकरी मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या करत आहे शासनाने याचा विचार करावा , राहिलेले शेतकरी यांना कर्ज माफी देण्यात यावी.
मुलांचे शिक्षण आणि मुलींची लग्ने या मुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात कर्ज बाजारी होत आहे
त्यामुळे जे शेतकरी कर्ज माफीपासुन वंचित राहिले आहेत त्यांना कर्ज माफ व्हावे व पुन्हा नव्याने कर्ज मिळावे.
अ नं शेतकर्‍याचे नाव पत्ता मो. नंबर थकीत कर्जाची रक्कम कर्ज घेतलेले वर्ष
1 सोमनाथ श्रीमंत डोके खरोसा त. औसा जि. लातूर 9730762728 20000 2010
2 कलावती सुधाकर भोसले वड देगाव ता. मोहोळ जि. सोलापूर 9049069796 200000 2012
3 शिवाजी कृष्णदेव कोकरे ब्रम्हपुरी ता. मंगळवेढा जि. सोलापूर 9503777993 133000 2013
4 राजाभाऊ गणपती देशमुखे ब्रम्हपुरी ता. मंगळवेढा जि. सोलापूर 9594822611 90000 2014
5 काकासाहेब आण्णासाहेब पाटील ब्रम्हपुरी ता. मंगळवेढा जि. सोलापूर 8080923911 200000 2015
6 हमीदा युन्नुस मुलाणी ब्रम्हपुरी ता. मंगळवेढा जि. सोलापूर 9730918485 90000 2017
7 अशोक शिवाप्पा डोके खरोसा त. औसा जि. लातूर 7767093615 200000 2017
8 शिवाप्पा बजाप्पा डोके खरोसा त. औसा जि. लातूर 7767093615 200000 2017
9 किशोर आनंदराव बिराजदार तारंबवाडी ता. निमगाव जि. लातूर 9156925181 23000 2017
10 ज्ञानोबा मारुती क्षीरसागर खरोसा त. औसा जि. लातूर 9503466291 200000 2017
11 आत्माराम गंगाराम रांगडे ढालेगाव ता. धनसंगावी जि. जालना 8380818601 139000 2017
12 रेवणसिद्ध दत्तात्रय कुंभार बेगमपुर ता. मोहोळ जि. सोलापूर 9545206699 200000 2018
13 दिलीप महादेव पवार नाईल गाव ता. नारशी जि. नांदेड 7798151670 194000 2018
14 धुलाबाई व्यंकटरव बिराजदार तारंबवाडी ता. निमगाव जि. लातूर 8390530412 45000 2018
15 हिराजी ईश्वर भुरे खरोसा त. औसा जि. लातूर 9923643080 65000 2019
16 बिराप्पा सिद्धप्पा घागरे दरबडी ता. जात जि. सांगली 9822434381 23000 2018
असे अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिलेले आहेत त्यांना कर्जमाफी मिळावी अशी विनंती मल्हारी शिवाजी कोकरे यांनी अर्जाद्वारे केली आहे. सोबत काही अर्जाच्या प्रती पाठविला आहेत,
1. मा. उद्धवजी ठाकरे साहेब, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.
2. मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब, विरोधी पक्षनेते.
3. मा. आ. निलम गोरे
4. मा. आ. नानासाहेब पटोले साहेब. अश्या प्रकारे शेतकऱ्यांचे कर्ज लवकरात लवकर माफ करतीलच अशी अपेक्षा शेतकरी बांधव बाळगत आहेत.