सामाजिक कार्यकर्ते शिवानंद पांचाळ नायगांवकर यांनी जिवंत माणसात देव पहावा ही युक्ती अंगिकारत निराधार वृद्ध मातेला चोळी – लुगडी भेट देऊन केले सन्मान

43

✒️माधव शिंदें(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नांदेड(दि.24जानेवारी):-अविरत समाजसेवेचा वसा घेतलेल्या सामान्यांतील असामान्य सामाजिक कार्यकर्ते शिवानंद दत्तात्रय पांचाळ नायगांवकर यांनी जिवंत माणसात देव पाहावा ही युक्ती अंगिकारत निराधार,दिव्यांग वयवृद्ध महिला मध्येच देव आहे,हे समजत कर्तृत्ववान, कष्टकरी,निराधार वृद्ध असलेल्या श्रीमती सुंदरबाई गंफू पांचाळ या मातेला चोळी/लुकडी मिठाई सन्मापुर्वक भेट देऊन वृद्ध मातेचा केला सन्मान,निराधार वृद्ध श्रीमती सुंदरबाई गुंपू पांचाळ यांचा संघर्षमय जीवन प्रवास, वयाच्या ११ व्या वर्षापासून मोल मजूरी करत असलेल्या वृद्ध मातेचे मुळ गांव कंधार तालुक्यातील बामणी आहे, गेल्या ३० वर्षापूर्वी नायगांव येथे मजुरी साठी आले असता पतीच्या निधनानंतर संकटांनां तोंड देत खचून न जाता परिस्थिती अत्यंत हालाखीची असताना त्यांना राहण्यासाठी स्वत:च घर जागा शेती काहीच कुठलाही आधार नसताना जगण्याची उमेद ठेवत कष्ट करून आज जिवन जगत आहेत.

हा सन्मान मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून होता,एक स्त्री असुनही कष्टाने व धाडसाने स्वाभिमानी जिवन जगू शकते,निराधार वृद्ध मातेचा प्रेरणादायी सन्मान केल्याने शिवानंद दत्तात्रय पांचाळ नायगांवकर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे, नायगांव येथील शिवानंद पांचाळ यांनी आपल्या साथीदारांना सोबत घेऊन कोणते ना कोणते सामाजिक उपक्रम गरजवंतासाठी साठी घेत असतात, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही देशाच्या संकटात केलेल्या कार्याचा सन्मान व्हावा म्हणून त्यांनी कर्तव्य दक्ष डाॅक्टर, परिचारिका,पोलीस अधिकारी, विविध क्षेत्रातील बांधव भगिनींचा कोव्हीड योद्धा सन्मानपत्र देऊन सन्मान गौरवाचा उपक्रम राबवले,मात्र या वेळेला जिवंत माणसात देव पहावा ही व्यक्ती अंगिकारत निराधार दिव्यांग वयोवृद्ध महीला यांच्यातच देव आहे, समजत त्यांना सन्मानपूर्वक चोळी/लुगडी भेट दिली अशा आगळ्या वेगळ्या उपक्रमाने शहरात चांगलीच वाहवाह होताना दिसत आहे.

यावेळी शिवानंद पांचाळ नायगांवकर म्हणाले की महिला संघर्षमय जीवन जगत असते म्हणून ग्रामीण भागातील महिला घडली तर देश घडेल,प्रत्येक कष्ट करणारी स्त्री सुद्धा सन्मानास पात्र आहे, जेवढी एक कलेक्टर महिला सन्मानास पात्र आहे, असे मत व्यक्त करत,मि एक सामान्य माणूस आहे,सामान्य म्हणून काम केले आहे, आणि आजही सामान्य माणसाला आधार देण्यासाठी थोडासा प्रयत्न करत आहे, शंभर टक्के समाज कारण हा स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा घेऊन काम करत आहे, असे मत शिवानंद दत्तात्रय पांचाळ यांनी मांडले.