आदिवासी विकास संघाच्यावतीने टोकरे कोळी वधुवर सूचक मेळावा आयोजित

34

✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)मो:-9075716526

धुळे(दि.26जानेवारी):-आदिवासी विकास संघाच्या वतीने ता. जि. धुळे येथे रविवार दि. ७ फेब्रुवारी २०२१ रोजी आदिवासी आद्यकवी महर्षी वाल्मिकी मंदिर (महादेव मंदिर) जवळ सकाळी ठीक १०.०० वा. कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी धुळे नंदुरबार व जळगाव जिल्ह्यातील आदिवासी कोळी ढोर किंवा टोकरे कोळी, डोंगर कोळी किंवा कोळी महादेव, कोळी मल्हार या आदिवासी कोळी जमातीतील विवाह इच्छुक वधू-वर तसेच विधवा, विधुर, घटस्फोटीत वधूवरांनी व त्यांच्या पालकांनी लाभ घ्यावा.

     तसेच या कार्यक्रमात संस्थेच्या वतीने सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात उत्तम काम करणाऱ्यांना पुरस्कार दिला जाणार आहे.तसेच आदिवासी टोकरे कोळी जमातीच्या जातीचा दाखला वैधता दाखला कसा काढावा? यासंदर्भात वकील गणेश सोनवणे व तज्ञ लोकांची टीम येणार आहे.तरी या कार्यक्रमाचे आयोजन खालील मान्यवरांनी केले आहे.

आदिवासी विकास संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मोतीलाल सोनवणे, नामदेव (आप्पासाहेब) येळवे,जिल्हाध्यक्ष संजय दावळे, उपजिल्हाध्यक्ष संदीपभाऊ तवर, संग्राम विनायक शिरसाट, अंकुश विष्‍णु शिरसाट, पैलवान दिलीप शिरसाट, पैलवान सावकार शिरसाट, पैलवान रोहिदास शिरसाट, दीपक नामदेव सोनवणे, सुरेश शिवाजी सोनवणे, पंकज रमेश शिरसाट, भाईदास नारायण सोनवणे, गोकुळ भिला शिरसाट, भगवान सुखदेव शिरसाट, भिलेश्वर भिका नवसारे, मनोज मधुकर शिरसाठ, नितीन गोरख बोरसे, यशवंत दगा शिरसाट, अशोक दयाराम काकुळदे, डॉक्टर सुरेश काकुळदे, भारत शिरसाट सर, मच्छिंद्र शिरसाट सर, विलास शिरसाठ सर, वसंत भाऊराव शिरसाट, रविभाऊ मंडाले, सुकलाल दौलत शिरसाट तरी जास्तीत जास्त मान्यवरांनी कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आव्हान केले आहे.