प्रहार दिव्यांग संघटनेने पुकारलेले ढोल बजाव आंदोलन यशस्वी

    54

    ✒️चांदू आंबटवाड(नायगाव,तालुका प्रतिनिधी)मो:-9307896949

    नांदेड(दि.28जानेवारी):-2016 च्या कायद्याची अंमलबजावणी,5 % निधी, घरकुल योजना, शौचालय योजना, अंत्योदय योजना, व्यापारी गाळे,व्यवसायासाठी 200 स्क्वेअर फुट जागा, पडीक गायरान जमीन या व अन्य मागण्यासाठीप्रहार संघटनेने ढोल बजाव आंदोलन 25 जानेवारी रोजी केले होते. या आंदोलनाला विविध संघटनेच्या प्रमुखांनी पाठिंबा दिला होता व नांदेड जिल्ह्यातील हजारो दिव्यांग बांधवांनी आंदोलनात सहभाग झाले होते. नांदेडचे जिल्हाधिकारी मा.ईटनकर साहेबांनी आंदोलकांना आश्वस्त केले की, मी लवकरच विविध खाते प्रमुखांची बैठक बोलावून दिव्यांगांच्या रखडलेल्या प्रश्नावर चर्चा करून त्या त्वरित कशा सोडवता येतील याचा प्रयत्न करतो असे सांगितले.

    या मोर्चात मा.विठ्ठलरावजी मंगनाळे,मा.विठ्ठलरावजी देशमुख, मा.गणेश पा.हंडे, मा.पंढरीनाथ हुंडेकर, मा.राहुल साळवे,चंपतरावजी डाकोरे, मा.मारोती मंगरूळे, मा.चांदू आंबटवाड, मा.राजु ईबितवार, मिलिंद कागडे,बाळासाहेब डाकोरे,साईनाथ बोईनवाड नायगाव, राजेश्री गवलवाड मुखेड, विरभद्र चेंडके देगलूर, हानमंत सिताफुले बिलोली, साईनाथ पा.जुन्नीकर धर्माबाद, संगीता बामने गोळेगावकर उमरी, अनिल पा. शेट्टे मुदखेड, शेख दस्तगीर कंधार, संदिप एरंडे लोहा,हानुमंत ढगे भोकर, विनोद कोकाटे नांदेड, सौ.केशरबाई शिंदे मुदखेड,शंकरराव शिंदे, दिगंबर लोणे, मल्हारी महादाळे, वामन चिंताके, खुर्शीद बेगम, जावेद चाऊस, जावेद शेख,मिना शिंदे, सरोजना धारासुरे, अंजना सोलेवाड मांजरी, प्रमीला रोडे कन्हेरवाडी व हजारो दिव्यांग बांधव हजर होते.