गोंदेडा गुंफा स्थळाला वृंदावन सारख करणार – आमदार बंटीभाऊ भांगडीया

31

🔸गोंदेडा गुंफा यात्रा महोत्सव

🔹कोरोना संकट काळात सुद्धा शेकडो गुरुदेव भक्तांची मास्क लावून हजेरी

✒️चिमूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमूर(दि.28जानेवारी):-कोरोना काळात एकमेकांच्या आरोग्याची काळजी घ्यायची असल्याने गुरुदेव भक्तांनी आपल्याच घरी गुरुदेवाचे अभिवादन करायचे आहे . कोरोनाचा काळ आहे मला अजून पर्यत ग्रामगीता कळली नसली तरी विश्वास ठेवणे गरजेचे असल्याचे सांगत आमदार बंटीभाऊ भांगडीया म्हणाले की,यात्रेतील एकाही गुरुदेव भक्ताला कोरोनाचा धक्का लागणार नाही कारण गुरुदेवाचे आशीर्वाद आहे.तपोभूमी चा विकास करण्यासाठी आम्ही पूर्ण सहकार्य करणार आहे.तपोभूमी ला चारधाम सारखा विकास करायचा आहे मागील जन्माचे पुण्य असेल ते आज माझ्या माध्यमातून विकास कामे होत आहे . ज्या दिवशी गुरुदेवांच्या मनात वृदावन करण्याची इच्छा होईल त्या दिवशी गोंदेडा गुंफा वृदावन होईल गुरुदेवाचे विचार प्रत्येकाच्या घरी रुजू होइल असा आशावाद आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी व्यक्त केले.

ब्रह्मलीनराष्ट्रसंत तुकडोजी महाराज तपोभूमी गोंदेडा गुंफा यात्रा ६१ व्या महोत्सव मध्ये आमदार बंटीभाऊ भांगडीया बोलत होते.यावेळी महोत्सव कार्यक्रम अध्यक्ष भोजराज कामडी ,माजी आमदार मितेशजी भांगडीया , अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज मोझरी चे सरचिटणीस जनार्दन पंत बोधे गुरूजी,लक्ष्मणराव गमे , प्रा निळकंठ लोनबले ,डॉ श्यामजी हटवादे , माजी सभापती राजू पाटील झाडे, प्रा अशोक चरडे डॉ देवनाथ गंधारे ,टीमु बलडवा अशोक कामडी प्रकाश पोहनकर आदी उपस्थित होते.
माजी आमदार मितेशजी भांगडीया म्हणाले की गोंदेडा गुंफा यात्रेत राजकारणातील लोकांना व्यासपीठ बंद केल्याचे स्वागत करीत गुंफा यात्रेस शुभेच्छा दिल्या.प्रास्ताविक विठलराव सावरकर यांनी केले दरम्यान काळे महाराज यांचा कीर्तन व गोपालकाला झाले. कोरोना काळ असल्याने सुद्धा शेकडो गुरुदेव भक्त मास्क लावून उपस्थित होते.