दिव्यांग कायद्याअंतर्गत कुंटूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल या अधिनियमाखाली तालुक्यातील हा पहिलाच गुन्हा

36

✒️चांदू आंबटवाड(नायगाव,तालुका प्रतिनिधी)मो:-9307896949

नायगाव(दि.5फेब्रुवारी):- तालुक्यात प्रथमच दिव्यांग अधिनियम २०१६ या कायद्याअंतर्गत कुंटूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. चंदर कामठे या दिव्यांग बाधवावर संख्या भावनेच लोखंडी कत्तीने वार करून गंभीर जखमी केल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक करीम पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली कुंटूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि नायगाव तालुक्यातील देगाव येथील दिव्यांग बांधव चंदर आनंदा कामठे व त्यांची पत्नी हे त्यांच्या अंगणात बसून हरभराचे ढाळे खात असताना चंदर कामठे याचा भाऊ गोविंद कामठे या दोघ्या संख्या भावात वडिलोपार्जित सामान वाटणीच्या कारणावरून गोविंद कामठे व त्याची पत्नी या दोघांनी संगनमत करून दिव्यांग असलेल्या आनंदा कामठे यास लोखंडी कत्तीने व लाथाबुक्याने मारहाण केली.

सदरचा वाद सोडवण्यासाठी दिव्यांग आनंदा यांची पत्नी सोडवण्यासाठी गेले असता तीसही गोविंद कामठे व त्यांची पत्नी या दोघांनी लाथा बुक्याने मारहाण करून गंभीर जखमी केली असल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक करीमखांन पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली कुंटूर ठाण्यात चंदर कामठे या दिव्यांग बांधवांच्या फिर्यादीवरून कलम ३२३,३२४,५०४,५०६,३४ भादंवि सह्कलम ९२ (इ )दिव्यांग अधिनियम सन २०१६ प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास कुंटूर चे बिट जमादार पोना. शेख अब्दुल बारी हे करीत असल्याची माहिती ठाणे अंमलदार बाबुराव हिमगिरे यांनी दिली.

सदरचा गुन्हा दाखल करण्यासाठी प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हा सहसचिव चांदू आंबटवाड यांनी दिव्यांग अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे हा मुद्दा रेटून धरला असल्याने दिव्यांग अधिनियम सन २०१६ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.