दिव्यांग व वयोश्री सल्ला व मार्गदर्शन कक्ष स्थापन- दिव्यांग विकास संघर्ष समितीच्या मागणीला यश

28

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नांदेड(दि.7फेब्रुवारी):- जिल्हात सर्व प्रथम हदगांव तालुक्यात दिव्यांग व वयोश्री व्यक्तीसाठी सल्ला व मार्गदर्शन कक्षाचे उद्घाटन नांदेड जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकुर यांच्या हस्ते पंचायत समिती कार्यालय हदगांव येथे कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी गट विकास अधिकारी केशव गड्डापोड, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ठोंबरे, दिव्यांग विकास संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष समीर पटेल, दिव्यांग विकास संघर्ष समितीचे प्रसिद्धी प्रमुख अशोक चव्हाण यांच्यासह पंचायत समितीचे कर्मचारी व दिव्यांग व्यक्तीच्या उपस्थित दिव्यांग सहाय्यता व मार्गदर्शन कक्षाचे उद्घाटन आले. आणि या दिव्यांग कक्ष स्थापन करण्यासाठी दिव्यांग सहाय्यता कक्ष प्रमुख माधव आवळे, रामदास मिराशे, गजानन दांगट , दिव्यांग शाळेचे शिक्षक गजानन मोरे, व या कार्यक्रमात सुत्र संचालन विस्तार अधिकारी प्रदिप सोनटक्के यांनी केले. व तसेच सदर कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेऊन यशस्वीपणे कार्यक्रम पार पडला.

दिव्यांग व्यक्तीला शासकिय योजना व विविध सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी हदगांव येथील पंचायत समिती मध्ये दिव्यांग व वयोश्री व्यक्तीसाठी दिव्यांग सहाय्यता व मार्गदर्शन कक्ष स्थापन करण्यात आले आहे. या कक्षाच्या माध्यमातुन दिव्यांग व वयोवृद्ध व्यक्तींना सर्व योजनेची माहिती देण्यात येणार आहे.व तसेच शासकीय विविध सुविधेचा लाभ घेता येईल.आणि तालुका स्तरावरील दिव्यांग व्यक्तीला सल्ला व मार्गदर्शन या कक्षा मार्फत देणार आहे. दिव्यांग व्यक्तीचे तालुका स्तरावरील शासकिय प्रलंबित कामे, प्रश्न जलद गतीने व कमी वेळेत तात्काळ सोडविण्यात येईल.

व तसेच दिव्यांगाच्या व वयोश्री शासकिय योजनेची माहिती व ईतर योजनेची तक्रार दाखल केल्यानंतर संबंधित कार्यालयात पत्र व्यव्हार व सतत पाठपुरावा करून दिव्यांगाला न्याय व हक्क दिला जाईल. दिव्यांगाच्या तक्रारी वर तातडीने कार्यवाही करण्यात येईल.आणि दिव्यांग व्यक्तीच्या सर्व शासकिय योजनेची अंमलबजावणी करण्यात येईल. या कक्षाच्या माध्यमातुन दिव्यांग व्यक्तीचे कोणतेही प्रश्न प्रलंबित राहणार नाही. विशेष म्हणजे दिव्यांग मित्र अॅपच्या माध्यमातुन समाज कल्याण विभागातील दिव्यांगाच्या योजना, दिव्यांग व्यक्तीसाठी राखिव असलेला ग्राम पंचायती मधील 5% दिव्यांग निधी, स्वंय रोजगारासाठी दिव्यांगाला 200 स्केअर फुट जागा उपलब्ध करून देण्यात येईल.

बिज भांडवल योजनेच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तीला बॅंक मार्फत कर्ज वितरीत करण्यात येईल, दिव्यांगासाठी असलेले प्रथम प्राधान्याने घरकुल योजना, दिव्यांगासाठी कृत्रिम मोजमाप अवयव शिबीराचे आयोजन करुन साहित्य वाटप करण्यात येणार आहे, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत दिव्यांगाला जाॅब कार्ड तयार करुन दिव्यांगाला आप आपल्या गावातच 100 दिवस रोजगार उपलब्ध करून देणार आहे, दिव्यांग व्यक्तीचे सर्व शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक योजनेची माहिती या कक्षा मार्फत देणार आहे. व तसेच या कक्षा मार्फत दिव्यांग व्यक्तीला विविध शासकिय योजनांचा लाभ घेता येईल असे मत दिव्यांग विकास संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष समीर पटेल यांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या सोबत जमीर पटेल, अजिंक्य चव्हाण, शेख फारूख कुरैशी, कुबिर राठोड, अहेमद भाई, प्रियंका राठोड, सुनील सुर्यवंशी, मारोती लांडगे, अ. गफुर, अनिल सुर्यवंशी, शिवाजी माने, हरी सुर्यवंशी, शिवाजी कवाने, सुनिता पाईकराव, ज्ञानेश्वर मोरे ईतर दिव्यांग व वयोश्री व्यक्ती आणि पंचायत समितीतील सर्व विभागांचे कर्मचारी या उद्धाटन च्या वेळी उपस्थित होते…

“अनेक संकटावर मात करून स्वत: च्या पायावर उभे राहण्याची धेर्य, जिद्द व चिकाटी दिव्यांग व्यक्तीत असते. नांदेड जिल्हात जसे *सुंदर माझे कार्यालय* आणि *माझे गांव सुंदर गांव* अभियान राबविण्यात येत आहे. तसे दिव्यांग व्यक्तीसाठी *दिव्यांग सहाय्यता, सल्ला व मार्गदर्शन कक्ष* प्रत्येक तालुक्यात स्थापन करुन दिव्यांग योजनेची प्रभावी अंमलबजावणी करुन दिव्यांग व्यक्तीचा विकास करु”.- वर्षा ठाकुर(मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड.)

” दिव्यांग व वयोश्री व्यक्तीसाठी असलेले सर्व शासकिय योजनेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी मी सतत प्रयत्नशील व कटीबद्ध आहेत. दिव्यांग व्यक्तीला दिव्यांग सहाय्यता, सल्ला व मार्गदर्शन कक्षा मार्फत न्याय व हक्क मिळवुन देऊ”- केशव गड्डापोड (गट विकास अधिकारी, पंचायत समिती हदगाव)