तिला आधी नराधमांनी विवस्त्र केले

29

*नंतर बाजारात हिंडवले❗,*
*तिच्या नितंबावर बाभळीचे काटे आणि टोकदार काट्या टोचून टोचून तिला वघायाळ केले❗*
*नंतर झोपडीत नेऊन दोन डझन नराधमांनी बलात्कार केले❗*
*आणि अखेर हापशावर तिचे डोके आपटून आपटून तिचा मेंदू बाहेर काढला❗*
*मग नग्न प्रेताची मिरवणूक काढून ते वाहत्या कॅनॉल मध्ये फेकून दिले❗*
कारण काय तर स्वाभिमानाने जगणे जातीय अन्याया विरुद्ध आवाज उठविणे !
*जातीयभेद विरुद्ध अत्यंत ताकतीने आवाज उठवणाऱ्या *उतरंड* चित्रपटातील ही मन विषन्न करणारी थरारक दृश्य
*आंबेडकरी चळवळीचा हा झंझावाती चित्रपट,* आणि विशेषतः खैरलांजी सारख्या भीषण हत्याकांडावर आधारलेल्या, अशा चित्रपटातली प्रमुख भूमिका *प्रवरा कुलकर्णी* नावाच्या अभिनेत्रीने अत्यंत शिताफीने साकारली. हे एक अप्रूपच म्हणावे लागेल.
*सुरेखा भोतमांगे, म्हणजे अत्यंत स्वाभिमानी स्त्री,शेतात राब राब राबून मुलांना शिकविणारी, डॉ. बाबासाहेबाना नुसती पुजणारी नव्हे तर समजनारी, शेतातला माल बाजारात जाऊन विकणारी, महिला बचत गट चालविणारी, निडर स्वभावाची स्त्री, अन्याय सहन न करणारी स्त्री,*
अशा स्वाभिमानी तडफदार आंबेडकरी विचाराच्या स्त्री ची भूमिका ह्या शांत विनम्र स्वभावाच्या प्रवरा कुलकर्णी साकारतील की नाही अशी शंका मला येत होती. परंतू शरीरयष्टी रंग character शी खूपच मिळता जुळता दिसत होता.

*प्रवरा ने स्वतःच सांगितले की मी अनेक आंबेडकरी चळवळीच्या नाटकांतून भूमिका वठवल्या आहेत. त्यामुळे बुद्ध आणि आंबेडकरी विचार मला नवखे नाहीत, त्यांच्या या स्पष्टीकरणा मुळे माझे अर्धे अधिक टेन्शन दूर झाले*
परंतू त्यांचे व्यक्तिगत जीवनातील चालणे बोलणे वागणे फारच सोफिस्टिकेटेड नीट नेटके असे होते भूमिका साकारताना त्यात बदल करावा लागेल अशी सूचना मी केली.
*आणि शेवटी मी त्यांना सांगितले कि या चित्रपटात किमान दोन दृष्य निमवस्त्र राहून शूट करावे लागतील. तशी तयारी असेल तरच पुढे बोलू. प्रवरा बाई थोड्या अंतर्मुख झाल्या.. म्हणाल्या मिस्टरांना फोन केला तर चालेल का? म्हटलो नक्कीच करा. त्यांची संमती फार फार आवश्यक आहे.*

बाई आमच्या घरासमोरच्या गॅलरीत गेल्या आणि 15 मिनिटे फोनवर बोलल्या. नवऱ्याने विचारले समोरची व्यक्ती कशी आहे? बाई म्हणाल्या साहेब खूप विनम्र आणि प्रामाणिक दिसताहेत. त्यांनी फारच तळमळीने कथा सांगितली. इतक्या तळमळीने कि जणू ती घटना त्यांच्याच बाबतीत घडलीय…
*नवरा त्यांचा पत्रकार, दुनियादारीची समज असलेला.. म्हणाला ते दृश्य कथेला अनुसरून असेल तर करायला काहीच हरकत नाही.*
प्रवरा मॅडम नी येऊन त्यांच्या नवऱ्या सोबत झालेले सारे बोलणे मला जसेच्या तसे सांगितले. आणि म्हणाल्या माझी तयारी आहे ही भूमिका करण्याची!
*म्हटलो आपल्यात अग्रीमेंट होईल! तुमच्या मिस्टरांना देखील यावे लागेल. म्हणाल्या ok.*
अग्रीमेंट झाले आणि मॅडम न चुकता पुण्याहून नेहमी दीड वर्ष 275 किलोमीटर चा प्रवास करुन शूटिंग साठी हजर राहिल्या. न कुठली मागणी न डिमांड. सतत प्रेमळ वागणे विनम्र बोलणे.

*परंतू अभिनयाची क्षमता इतकी दांडगी कि सारे जण अवाक होऊन जायचे.*
जमीनदाराकडचा घरगडी जेव्हा मेलेले जनावर उचलण्या साठी बोलवायला येतो तेव्हा ती त्याला हाकलून लावते. ते दृष्य प्रवराने अफलातून चेतवले.
*Police स्टेशन मध्ये इन्स्पेक्टर लाच सुनावते कि तुझ्या मुखातून शिव्या बाहेर पडतात ती गंगा आणि आम्ही काही बोललो तर गटर गंगा !*
इन्स्पेक्टर कडे मुलीची छेडछाडीची तक्रार नोंदवायला जाते तेव्हा to नाकारतो तेव्हा ती direct वरच्या पातळीवर तक्रार करण्याची धमकी देते ते दृश्य तर खूपच आव्हान देते
*घरावर झुंड हल्ला करते तेव्हा सर्व दारुड्याना सुनावते कि ”जा आधी लिंबू पाणी पिऊन या मग माझ्याशी बोला”*
जळते चुलीतले लाकूड घेऊन त्यांना पळविण्या साठी ती चारा पेटवते. तो आवेश त्वेष एकदम जबरदस्त !
*सरपंच आणि गावची चांडाळ चौकडी जेव्हा घर दुरुस्ती करण्यासाठी विरोध करायला येतात तेव्हा आणि तिच्या शेतातून गाववाले घुसतात तेव्हा ती एकटी रणरागिणी बनून त्यांना पळवून लावते.*
शेवटी तिचे डोके हापशावर आपटतात तो अभिनय यत्किंचित देखील शंका येणार नाही इतका खरा वाटतो. ना आरडा ओरडी न प्रतिकार.. ते दृश्य आपले सर्व गलीत गात्र बधिर करतात.
*अशा या प्रवरा कुलकर्णी नावाच्या प्रतिभाशाली अभिनेत्रीचे आम्ही हयातभर उपकृत राहू !*
संगीता गायकवाड आणि प्रवरा या दोघींनी संपूर्ण चित्रपट *आपल्या त्यागाने आणि अनन्य साधारण अभिनयाने आपल्या खांद्यावर पेलला आहे. आम्ही त्या समोर आल्या कि त्यांचे चरणस्पर्श केल्या शिवाय राहत नाही !*
असा हा चित्रपट पुन्हा होने नाही.. प्रत्येक महिलेने बघावा आणि काहीतरी बोध घ्यावा असा हा चळवळीचा झंझावाती चित्रपट ! 25 ऑक्टोबर रोजी ऑनलाईन रिलीज झालाय.

*200/500/1000 रुपये चळवळीला धम्मदान केले तर चित्रपटाची link आपल्या whatsap वर मिळते,*

गूगल पे /पे 9820208028
*A/c Bank of Maharashtra*
20026168987
Ifsc- MAHB 0000902
*Andheri Mumbai 58*
संपर्क
Sudam Waghmare
Writer/Director 9833777250/ 9820208028