प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे लातूर जिल्हाध्यक्ष लहु शिंदे जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

26

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नांदेड(दि.9फेब्रुवारी):-मातोश्री रमाबाई भीमराव आंबेडकर सामाजिक संस्था व माता रमाबाई फाउंडेशन बेटमोगरा तालुका मुखेड जिल्हा नांदेड २०२१ चा जीवन गौरव पुरस्कार सुवर्णयुगचे मुख्य संपादक तथा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघाचे लातूर जिल्हाध्यक्ष लहू शिंदे यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. लहू शिंदे यांनी पत्रकारिता क्षेत्रात केलेल्या उल्लेखनिय कार्याचा विचार करून हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. माता रमाबाई आंबेडकर यांची १२३ वी जयंती व पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला. माता रमाबाई फाऊंडेशन हे अनेक उपक्रम राबवत असते या फाऊंडेशनचे हे सातवे वर्ष असून २०२१ चा जीवन गौरव पुरस्कार सुवर्णयुगचे संपादक तथा संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य लातूर जिल्हा अध्यक्ष लहू शिंदे यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.

सामाजिक बांधिलकी जोपासत मानव कल्याणासाठी सामाजिक क्षेत्रात वयोवृद्ध व्यक्तीची नेत्र तपासणी, आरोग्य तपासणी, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव, व्याख्यानमाला, प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. मातोश्री रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीदिनी व्याख्यान व पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात धम्म ध्वजारोहण सेवानिवृत्त पोलीस आयु दिगंबर सोनकांबळे यांच्या हस्ते झाले. तानाजी वाघमारे दिवाणी व फौजदारी न्यायालय मुखेड, प्रा. चंद्रकांत गायकवाड महाविद्यालय वसंत नगर यांनी मनोगत व्यक्त केले तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दत्तात्रय बाजीराव पाटील यांची उपस्थिती होती.

याप्रसंगी अनिल शिरसे रि प सेना नांदेड जिल्हाध्यक्ष, डॉ. सुनील कांबळे पशु वैद्यकीय अधिकारी, शिवाजी पाटील, डॉ. जगदीश कांबळे वैद्यकीय अधिकारी, मोहन गायकवाड प्रजासत्ताक पार्टी तालुका अध्यक्ष मुखेड, सुशील पत्की दत्तात्रय कांबळे, विजय बनसोडे, महताब शेख, अनिल कांबळे, जैनुद्दीन पटेल, संजय कांबळे, आशिष कुलकर्णी, गंगाधर सोंडारे, ज्ञानदेव डोईजड, नामदेव पवार, रंजीत जामखेडकर, असद बक्षी, मोती पाशा पालेकर, पवन जगडमवार, सचिन चव्हाण, मुस्तफा पिंजारी तसेच पुरोगामी विचारांचा विकासच्या संपादिका तथा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघाच्या लातूर जिल्हा महिलाध्यक्षा वैशाली पाटील यांचाही सन्मान करण्यात आला.

फाऊंडेशनचे सचिव भारत सोनकांबळे यांनी आभार मानले तर सूत्रसंचालन मयुरी यांनी केले. कार्यक्रमासाठी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.