महाविर नगर येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती साजरी

25

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)मो:-7875157855

पुसद(दि.9फेब्रुवारी):– दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पुसदच्या अंतर्गत वार्ड शाखा महावीर नगर येथील पारमिता बुद्ध विहार येथे त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांची १२३ वी जयंती साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रचार व पर्यटन जिल्हा सचिव भगवान बरडे हे उपस्थित होते .

तर प्रमुख अतिथी म्हणून जि.प. सदस्य भोलानाथ कांबळे, तालुकाध्यक्ष माजी सैनिक भारत कांबळे, माजी सैनिक नितीन धुळे, वार्ड शाखाध्यक्षा शांताबाई मंडाले, गौतम बरडे, सचिन धुळध्वज, बाळासाहेब ढोले उपस्थित होते.

यावेळी जि. प .सदस्य भोलानाथ कांबळे यांनी मार्गदर्शन केले .तसेच प्रचार व पर्यटन जिल्हा सचिव भगवान बरडे यांनी अध्यक्षीय भाषण करताना सांगितले की रमाईचे जीवन हे उच्च आदर्शाने ओतप्रोत भरलेले आहे डॉ. बाबासाहेबांच्या आयुष्यातला अमूल्य वेळ समाजोपयोगी ,देशपयोगी व सत्कारणी खर्ची व्हावा म्हणून रमाई स्वतः जीवनभर दुःखात होरपळत राहिल्या पण दुःखातही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी खंबीर राहिल्या आणि रमाईच्या त्यागामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपणा भारतीयांना सुंदर असे भारतीय सविधान देऊ शकले.

यावेळी कौशल्याबाई कांबळे, शालूताई बरडे, विजयाताई कांबळे ,संगीता कांबळे, छाया धुळध्वज, निर्मला इंगळे, रमा बरडे, दीपाली कांबळे, मीनाक्षी कांबळे ,सुनिता खिल्लारे ,स्वाति वाघमारे ,चंद्रकला रंगारी इत्यादी उपासक-उपासिका प्रामुख्याने उपस्थित होत्या .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता रंगारी यांनी केले. तर आभार कल्पना मंडाले यांनी मानले .या कार्यक्रमाची सांगता सरणतय गाथेने करण्यात आली.