माण तहसीलदार याचे लेखी आश्वासनाने बहुजन समाज पार्टी याचे धरणे आंदोलन मागे

33
✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड-माण)मो:-9075686100

म्हसवड(दि.9फेब्रुवारी):-गेल्या काही दिवसापासून बहुजन समाज पार्टी माण तालुका यांच्यावतीने माण तहसील कार्यालयाच्या समोर ठिय्या आंदोलन उभारले होते. काही दिवसांपूर्वी बहुजन समाज पार्टी यांच्या वतीने मान तहसीलदार यांना आपल्या विविध मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले होते.

परंतु याची कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेली नसल्यामुळे बसपाच्या तालुका कार्यकारणी च्या कार्यकर्त्यांनी माण तहसील कार्यालयाच्या बाहेर गेल्या चार पाच दिवसापासून धरणे आंदोलन पुकारले होते परंतु तहसील प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचे यात लक्ष दिले गेले नव्हते या काळात माण तालुक्यातील विविध संघटनेचे पदाधिकारी वंचित बहुजन आघाडी चे नवनिर्वाचित माण तालुका अध्यक्ष युवराज भोसले, संतोष घाडगे यांनी पाठिंबा दर्शविला होता तसेच गोंदवले बुद्रुक येथील नवनिर्वाचित सदस्य अनिता रणपिसे यांनीही या आंदोलनस्थळी येऊन आपला पाठिंबा दर्शविला होता.माण तालुक्यातील रिपब्लिकन संघटनांनी पाठिंबा याला दिला होता.
यानंतर वेळोवेळी तहसील प्रशासनाला कार्यकर्त्यांनी भेट देऊन सल्लामसलत करूनही काही तोडगा निघत नव्हता कार्यकर्ते आणि तहसील प्रशासन यांच्यात चर्चा झाल्यानंतर आपले आंदोलन मागे घ्यावे अशी विनंती करण्यात आली आणि स्वतः नायब तहसीलदार यांनी या कार्यकर्त्यांना लेखी निवेदन देऊन आश्वासन देऊन आपले आंदोलन मागे घ्यावे अशी विनंती केली आणि आपल्या मागण्यांवरती तहसिल प्रशासन पूर्णपणे विचार करेल आणि आपल्याला न्याय देईल असे नायब तहसीलदार यांनी सांगितले यानंतर बसपा माण तालुका कार्यकर्त्यांनी आपले उपोषण स्थगित करत आहे अशी घोषणा केली.