रंगोली अरुण पडघम यांची राष्ट्रवादी युवती बुलढाणा शहर अध्यक्ष पदी निवड

32

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)मो:-9561905573

बुलढाणा(दि.12फेब्रुवारी):- राष्ट्रवादी चे प्रदेश अध्यक्ष मा.श्री . जयंतरावजी पाटील साो , उपमुख्यमंत्री मा.श्री . अजितदादा पवार साो व राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या निमंत्रक मा.खा.सुप्रियाताई सुळे सो यांच्या मान्यतेने रंगोली अरुण पडघम यांची राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या बुलढाणा शहराध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात येत आली आहे.

पक्ष बळकटीसाठी तसेच पक्षाची ध्येय धोरणे आणि देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी आपण कार्यरत रहाल असा मला विश्वास आहे . असे नियुक्ती पञात उल्लेख आहे.