नगरपरिषद गंगाखेड येथील कायम व कंत्राटी सफाई कामगाराच्या न्याय व कायदेशीर मागण्या बाबत बेमुदत धरणे आंदोलन

34

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.15फेब्रुवारी):- नगर पालिकेसह सर्वच नगरपालिका मध्ये नगरपरिषद प्रशासनचा अनागोंदी कारभार चालू आहे त्याबाबत वेळोवेळी आपणास तसेच संबंधित नगरपरिषदेच्या मुख्याधिकार्‍यांना निवेदन देण्यात आली त्यानंतर जिल्हा नगरपरिषद प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सर्व मुख्य अधिकाऱ्यांची बैठक संघटनेसोबत आपल्या कार्यालयात घेण्याचे आश्वासन दिले परंतु आज पर्यंत वरील सर्व निवेदनाची आपण कोणतेही ठोस दखल घेतली नाही त्यामुळे नगरपरिषद प्रशासनावर जिल्हा प्रशासनाचा कोणताही अंकुश राहिलेला नाही असे दिसते. गंगाखेड नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांनी दिनांक 11/ 12/ 2020 रोजी त्यांच्या खालील मागण्याचे निवेदन संबंधित मुख्य अधिकाऱ्यांना सादर केले होते.

परंतु मुख्याधिकारी नगरपरिषद गंगाखेड यांनी दिनांक 22/01/ 2021रोजी लेखी उत्तर दिले परंतु ते अत्यंत समाधानकारक असून कोणताही प्रश्न ठोसपणे नगरपरिषद प्रशासन निकाली काढले नाही खालील प्रमाणे मागण्या आहेत. १) नगर परिषदेतील कामगार कर्मचाऱ्यांचे वेतन दर महिन्याच्या पाच तारखेला देण्यात येऊन त्यांना पे स्लिप देण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना बंधनकारक करावे. २) थकित सहाव्या वेतन आयोगाची रक्कम तात्काळ अदा करावी. ३) दिनांक 10 3 1993 नंतर सेवेत कायम झालेल्या कर्मचाऱ्यांना लाड कमिटीची शिफारशीनुसार वारसाहक्क लागू करावा. ४) पतपेढी बँकेचे सर्व थकीत हप्ते भुर्दंड व्याजासहित संबंधित कर्मचाऱ्यांच्या खात्यात भरावेत. ५)गंगाखेड नगरपालिकेतील सफाई कामगारासाठी घरकुलाची जागा उपलब्ध करून घरकुल योजना राबवावी. ६)गंगाखेड नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचा फरक अदा करावा. ७)गंगाखेड नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना डी ए.ची रक्कम तात्काळ देण्यात यावी. ८)गंगाखेड नगरपालिकेतील सफाई विभागातील डेप्यूटेशनवरील सर्व कर्मचारी त्यांना सफाई विभागात काम करण्याचे. आदेश देण्यात यावे.

९)गंगाखेड नगरपालिकेतील सफाई विभागातील कर्मचारी सेवनिवृत झाल्यानंतर त्याचा सत्कार नगर परिषद प्रशासना च्या वतीने करण्यात यावा.तसेच त्याच वेळी सेवनिवृत कर्मचार्याला त्याची सर्व थकीत रक्कम देण्यात यावी. १०) गंगाखेड नगरपालिकेतील सर्व कामगारांना कालबद्ध पदोन्नती देण्यात यावी. ११)सार्वजनिक सुट्ट्या च्या बदल्यात पर्यायी सुट्टी द्या व मोबदला देण्यात यावा. १२) खेड नगरपालिकेतील कंत्राटी कामगारांचे भविष्य निर्वाह निधीचे खाते न उघडणाऱ्या कंत्राटदारावर कायदेशीर कारवाई करावी व स्त्री व पुरुष सफाई कामगारांना समान वेतन देण्यात यावे तरी . वरील सर्व मागण्या साठी गंगाखेड नगर परिषदेतील सर्व सफाई कामगार काय मग कंत्राटी नगरपरिषद गंगाखेड कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सोमवारपासून दिनांक 15/12/ 2021 पासून बसलेले आहेत हे आंदोलनं मराठवाडा न.प.व म.न.पा.कामगार कर्मचारी युनियन(लालबवाटा) यांच्या कॉ.माधुरी राजन क्षीरसागर,कॉ भगवान कनकुटे, भुजंग साळवे, बाबू मुंडे, आनंता साळवे, जालिंदर गायकवाड, उषाबाई खंदारे इत्यादी.निवेदनावर स्वाक्षरी करण्यात आल्या आहेत