प्राध्यापक विश्वंभर बाबर यांची सातारा जिल्हा राष्ट्रीय काँग्रेस सरचिटणीस पदी निवड

32

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड-माण)मो:-9075686100

म्हसवड(दि.15फेब्रुवारी):-महाराष्ट्र राज्य कृषिरत्न पुरस्कार विजेते,कृषी पदवीधर, समाजकारण, माण तालुक्याच्या राजकारणात व शिक्षण क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्त्व प्रा. विश्वंभर बाबर सर यांची सातारा जिल्हा राष्ट्रीय काँग्रेसच्या सरचिटणीसपदी निवड झाली निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून बाबर सर यांचे अभिनंदन होत आहे.

त्यांची राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील वाटचाल ही समाजास प्रेरणादायी आहे असे या निवडीनंतर अभिनंदन पर बोलण्यात आले. ते संस्थापक असलेल्या क्रांतिवीर शैक्षणिक संकुल म्हसवड या शाळेतील सर्व शिक्षकांनी ही सर्वांचे मनापासून अभिनंदन केले आणि भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.